Home > मॅक्स रिपोर्ट > हे गाजर नक्की कोणाचं?

हे गाजर नक्की कोणाचं?

हे गाजर नक्की कोणाचं?
X

यंदाच्या निवडणुकीत गाजराची मागणी अचानक वाढली. भाजप सोडून सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर गाजराची खरेदी केली. निवडणूकीच्या राजकारणात पहिल्यांदाच गाजराला मानाचं स्थान मिळालंय. या प्रचारात गाजर नेमकं कुठून आलं आणि भाजपविरोधी सर्व पक्षांची गाजरावर एकवाक्यता कशी झाली याचा हा आढावा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराचा तडाखाच लावून दिला आहे. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या सभा सतत लाइव होत असल्याने विरोधकांचे धाबेच दणाणले आहेत. भारतीय पक्षाने आपली सर्वच शक्ती पणाला लावलेली आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड साठी तयार केलेली पार्लमेंट ते पालिका... गाजराची मालिका ही कँपेन जवळपास सर्वच पक्षांनी राबवून देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने गाजरांची मालिका ही कार्टून कँपेन जारी केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी दिवा येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जमलेल्या श्रोत्यांना गाजरं वाटली. यात आपण का मागे राहावं म्हणून काँग्रेस नेते संजय दत्त यांनी पार्लमेंट ते पालिका गाजरांची मालिका ही कार्टून सिरीज व्हायरल करायला सुरूवात केली. एकूणच देवेंद्र पडणवीस यांच्या विविध भाषणांमधील घोषणाबाजीवर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन शर(गाजर)संधान सुरू केलंय.

राजकीय जाणकार सांगतात की एकमेकांच्या कँपेनचं गाजर पळवण्याची ही अशी पहिलीच वेळ असावी. मतदार मात्र लांबूनच गाजराचा हा हलवा पाहून परेशान झालेयत.

Updated : 12 Feb 2017 5:43 PM GMT
Next Story
Share it
Top