Home > मॅक्स किसान > साखर कारखान्यांकडून यंदा विक्रमी इथेनॉल निर्मिती

साखर कारखान्यांकडून यंदा विक्रमी इथेनॉल निर्मिती

या वर्षी साखरेच्या हंगामाला सुरूवात होताच साखरेचे विक्रमी उत्पादन होत असतानाच दूसरीकडे या साखर कारखान्यांनी इथेनॉलचेही विक्रमी उत्पादन करण्याची तयारी केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी साखर आणि इथेनॉल निर्माण करणाऱ्या उत्पादकांबरोबर सन २०१७-१८ च्या हंगामासाठी ११३ कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्याचे म्हणजेच ४ हजार ५०० कोटी रुपयांचे करार केले आहेत.

गेल्या वर्षीच्या हंगामात ६६ कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्याचे करार झाले होते. यावर्षी त्यात ७० टक्यांची वाढ झाली असल्याची माहिती इस्मा (इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) ने दिली आहे. या हंगामात साखर आणि इथेनॉल उत्पादकांनी ११५ कोटी लिटर इथेनॉल विक्री कारारांची तयारी दर्शवली होती. मात्र ११३ कोटी लिटरचेच करार झाले कारण काही तेल डेपोंना १० टक्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिश्रऩ करण्याचे प्रस्ताव आले होते.

भारतात खपणाऱ्या एकूण पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळायचे झाल्यास ३१३ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. सरकारने सप्टेंबरमध्ये इथेनॉलला ४० रूपये ८५ पैसे प्रति लिटर असा दर निश्चित केला आहे. उत्तर प्रदेशातील साखर आणि इथेनॉल उत्पादक ४४.३ कोटा लिटर इथेनॉल निर्माण करतात तर महाराष्ट्रातील साखर आणि इथेनॉल कारखाने ४०.३ कोटी लिटर इथेनॉल बनवतात.

Updated : 9 Dec 2017 6:20 AM GMT
Next Story
Share it
Top