Home > मॅक्स रिपोर्ट > सत्तेसाठी वाट्टेल ते, वाट्टेल तसं...!

सत्तेसाठी वाट्टेल ते, वाट्टेल तसं...!

सत्तेसाठी वाट्टेल ते, वाट्टेल तसं...!
X

सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद हे सर्वच पक्षाचे उमेदार आघाडीवर असतात. पण, पुण्यात जे घडलं ते काहीतरी वेगळंच आहे. चऱ्होली मोशी प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपच्या शैला मोळक या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा देखील आहेत. पण, त्यांच्या नावानं या अशा काळ्या बाहुल्या त्यांच्या घरासमोर आणि बूथच्या आसपास टाकण्यात आल्या आहेत. त्यावर त्याचं नाव सुद्धा लिहण्यात आलंय. शैलाताईंनी त्याला जुमानल नाही, तो भाग वेगळा. पण लोक कोणत्या पातळीवर उतरून लोकशाहीचा खेळ करतात याचा नवा अनुभव यंदाच्या निवडणुकीत गाठीशी आलाय.

शैलाताई या घराणेशाहीतुन पुढं आलेल्या नाहीत. स्वतंत्र व्यक्तिमत्व, निर्णय घेण्याची क्षमता असलेली एक महिला म्हणून त्यांनी स्वतः स्वतःची ओळख निर्माण केली. गेल्या काही वर्षात त्यांनी चांगलं कामही उभं केलं. पण, भाजपमध्ये झालेल्या आयतीमुळे त्यांच्या तिकीटावर गदा आली होती. प्रतिस्पर्धी पैलवानांना त्यांनी चित करत उमेदवारी मिळवली आणि प्रचाराचा धडाका लावला. तरी सगळं सुरळीत झालं असं नाही. सर्व प्रचार त्यांना एकट्यानंच करावा लागला. त्यात आता हे प्रकार घडत आहेत.

राजकारणात आता 50 टक्के महिला दिसतात. पण त्यांची अवस्था कटपुतळी बाहुली सारखी. कोणाच्या तरी तालावर नाचणारी बाहुली ती. तिनं जरा जरी स्वतः निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर लगेच येन केन प्रकारे तिला दाबण्याचे कसोशीनं प्रयत्न सुरु केले जातात. अर्थात इथं ती राजकीय घराणेशाहीतून पुढे आली असेल तर चित्र थोडाफार वेगळं असतं. पण ज्या महिला कोणत्याही घराणेशाहीतुन पुढं येत नाही, त्यांच्यासाठी सगळंच अवघड असतं.

राजकारणाच्या आखडयात महिलांना खाली खेचण्याची एकही संधी हातची सोडली जात नाही. एकतर तिला काय कळत अस म्हणतं वडील, भाऊ, नवरा, सासरा यापैकी एक पुरुष सगळी सूत्र आपल्या हातात ठेवत असतो. असं असलं तरी काही जणी राहतात खंबीरपणे उभं. पण त्या कोलमडून पड्याव्यात म्हणून व्यवस्था पणाला लागते. अगदी पातळी सोडून काहीही केलं जात.

असो.....लायक उमेदवार नसेल तर NOTA चा पर्याय वापरा पण मतदान नक्की करा......

- अश्विनी सातव डोके

Updated : 20 Feb 2017 6:33 PM GMT
Next Story
Share it
Top