Home > मॅक्स रिपोर्ट > शुकदास महाराजाच्या आश्रमात नाही होणार संमेलन

शुकदास महाराजाच्या आश्रमात नाही होणार संमेलन

शुकदास महाराजाच्या आश्रमात नाही होणार संमेलन
X

मराठी साहित्य संमेलन शुकदास महाराजाच्या आश्रमात होणार नाही. बुलडाण्यातील हिवरा आश्रमात संमेलन होणार होते. मात्र अंनिस संस्थेचे प्राध्यापक श्याम मानव यांच्या टीकेमुळे आयोजकांनी प्रस्ताव मागे घेतला आहे. त्यामुळे आता ९१ वे मराठी साहित्य संमेलन हिवरा आश्रमात होणार नाही. या संबधीचे सर्व वाद मिटविण्याकरिता नियोजित संमेलनस्थळ रद्द करत असल्याचे 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीने म्हटले आहे.

विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष, आर. बी. मालपाणी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कायम संस्थानीकांचेच बटिक असावे, अशी इच्छा असलेला एक वर्ग आहे; त्यांना विवेकानंदांचा बुद्धिप्रामाण्यवाद, धर्मनिष्ठा आणि आश्रमाची त्याग, सेवा, समर्पणाची संस्कृती संमेलनाच्या आयोजनस्थळात अडचण ठरत आहे.’

संस्थेवर खोटेनाटे आरोप करावे लागत असतील व त्यातून आश्रमाच्या कार्याशी जोडलेल्या लाखो संवेदनशील स्त्री-पुरुषांची मने दुखवली जात असतील, व त्यांचा संमेलनातील सहभाग केवळ शारीरिक राहणार असेल तर संमेलनाचा उद्देशच सफल होऊ शकत नाही. असेही पत्रकात म्हटले आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत. विवेक विचारांचा प्रचार करणारे वादातीत असलेले विवेकानंद विचार साहित्य संमेलन स्वतंत्रपणे विवेकानंद जयंतीनिमित्त आम्ही आयोजित करणारच आहोत. असेही त्यांनी म्हटले आहे.

Updated : 14 Sep 2017 4:07 PM GMT
Next Story
Share it
Top