Home > मॅक्स रिपोर्ट > अधिवेशनाआधी विरोधी पक्षांमध्ये दरी

अधिवेशनाआधी विरोधी पक्षांमध्ये दरी

अधिवेशनाआधी विरोधी पक्षांमध्ये दरी
X

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पावसाळी अधिवेषनापूर्वी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज सकाळी ११ वाजता त्यांच्या सरकारी निवास्थानी बोलावली होती. मात्र, या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पाठ फिरवली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याने विधिमंडळात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात येणार आहे. मात्र, शरद पवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावा अगोदर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात यावा असा पवित्रा काँग्रेसने घेतल्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीत फुट पडल्याचे बोलले जात आहे. राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफ़ीची घोषणा झाली असली तरी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ मिळालेला नाही, राज्यावर दुबार पेरणीचे देखील संकट आहे.

त्यातच 'झोपु' मध्ये झालेल्या भष्टाचरामुळे हे अधिवेशन गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज्याचे विविध प्रश्न मांडून सरकारला धारेवर धरण्याऐवजी विरोधकांमध्ये भावनिक मुदयातून फूट पडल्याने जनतेचे प्रश्न पोट तिड़कीने सभागृहात कोण मांडणार हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

Updated : 23 July 2017 11:11 AM GMT
Next Story
Share it
Top