Home > मॅक्स रिपोर्ट > रामरहिमचे गायब झालेले स्टिंग ऑपरेशन सापडले!

रामरहिमचे गायब झालेले स्टिंग ऑपरेशन सापडले!

रामरहिमचे गायब झालेले स्टिंग ऑपरेशन सापडले!
X

बाबा रामरहिम बलात्कार प्रकरणात दोषी ठरला असताना आणि त्याच्या समर्थकांचे हिंसक थैमान रोखण्यात हरियाणा सरकार अपयशी ठरले असताना रामरहिमबाबत इंडिया टीव्हीने केलेले स्टिंग ऑपरेशन चर्चेत आले आहे. २००७ मध्ये केलेल्या या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ इंटरनेटवरून गायब झाला होता. मात्र हा व्हिडिओ आता यूट्यूबवर उपलब्ध झाला असून बाबाच्या दुष्कृत्यांचा या स्टिंग ऑपरेशनमधून स्पष्टपणे पर्दाफाश होत आहे.

२००७ मध्ये इंडिया टीव्हीवर या स्टिंग ऑपरेशनची बातमी प्रसारित करण्यात आली होती. इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक रजत शर्मा यांनी या बातमीपत्राचे अँकरिंग केले होते. तहलकाच्या पत्रकारांनी इंडिया टीव्हीसाठी हे स्टिंग ऑपरेशन केले होते. या स्टिंगमध्ये बाबा रामरहिमचा ड्रायव्हर खट्टा सिंग याने बाबाच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला आहे. खट्टा सिंग २००६ मध्ये सीबीआयसमोर बाबा रामरहिमच्या विरोधात साक्षही दिली होती.

याच स्टिंग ऑपरेशमुळे पीडित साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना लिहिलेले पत्रही उजेडात आलं होतं. इंडिया टीव्हीने स्टिंग ऑपरेशन दाखवताना या पत्रातील तपशील समोर मांडला होता. इंडिया टीव्हीने हे स्टिंग ऑपरेशन दाखवले असले तरी या स्टिंगचा व्हिडिओ मात्र इंटरनेटवरून रहस्यमयरित्या गायब झाला होता. हे स्टिंग ऑपरेशन ज्यांनी केले, त पत्रकार अनुराग त्रिपाठी आणि एतमद खान यांचं म्हणणं आहे की २०१४ मध्ये हा व्हिडिओ इंटरनेटवरून गायब झाला होता. अखेर तो व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवरून उपलब्ध झाला आहे. पण हा व्हिडिओ गायब कसा झाला होता, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. हा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.....https://youtu.be/CX4-yk5LB4Y

Updated : 26 Aug 2017 2:38 PM GMT
Next Story
Share it
Top