Home > मॅक्स रिपोर्ट > राज्यात चार ठिकाणी कॅन्सर रुग्णालय 

राज्यात चार ठिकाणी कॅन्सर रुग्णालय 

राज्यात चार ठिकाणी कॅन्सर रुग्णालय 
X

राज्यातील नाशिक, अमरावती, लातूर आणि नागपूर या चार ठिकाणी अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तारांकित प्रश्नावर लेखी उत्तर दिले आहे. आमदार जयवंतराव जाधव, अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे यांनी कॅन्सर रुग्णालयबाबत तारांकित प्रश्न विचारला होता.

कॅन्सरबाधित रुग्णांवर मुंबईतील परळ येथील टाटा रुग्णालयात उपचार होतात. कॅन्सरवर उपचार करणारे हे एकमेव रुग्णालय असल्याने राज्यासह विविध देशांतून रुग्ण येत असतात. याच धर्तीवर राज्य सरकारने नाशिक, अमरावती, नागपूर आणि लातूर येथे तृतीय सेवा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर रुग्णालय, लातूरमधील विवेकानंद फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर आणि रिजनल रेफरन्स रुग्णालय नाशिक या तीन रुग्णालयांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरी साठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी नागपूरच्या संस्थेचा प्रस्ताव केंद्राकडून मंजूर झाला असून उर्वरित दोन प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत, असे उत्तर डॉ. सावंत यांनी तारांकित प्रश्नावर दिले आहे.

Updated : 4 Aug 2017 12:37 PM GMT
Next Story
Share it
Top