Home > मॅक्स रिपोर्ट > मोपलवारांचे धंदे सुरूच ?

मोपलवारांचे धंदे सुरूच ?

मोपलवारांचे धंदे सुरूच ?
X

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वादग्रस्त आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पदावरुन हटवून सरकारने त्यांची चौकशी सुरु केली असली तरी त्यांचे धंदे मात्र थांबलेले नाहीत. मोपलवारांना मुख्यमंत्र्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं असलं तरी स्वत: मोपलवार आणि त्यांची खास माणसं यांनी आता मंत्रालयाजवळच्या एका पंचतारांकित हॉटेलात आपलं बस्तान बसवलंय. या हॉटेलमध्ये बसून मोपलवार आपला कारभार चालवतात. एवढंच नाही तर, 'चौकशीतून काही निघत नाही, साहेब पुन्हा कामाला लागतायत' असं मोपलवारांचा 'पिट्टू' या पंचतारांकित हॉटेलात बसून 'ग्राहकांना' सांगत असतो.

नरीमन पाॅईंटला कार्यालय?

राधेश्याम मोपलवारांसाठी सध्या हे पिट्टू नरीमन पाॅईंट परिसरात खासगी कार्यालयासाठी जागा शोधत आहेत. विधानभवनाच्या परिसरात काही कार्यालयाच्या जागांची चाचपणी केली आहे. एका आयएएस अधिकाऱ्याला खासगी कार्यालय कशासाठी हवं याचा शोध आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला पाहिजे.

कोण आहेत मोपलवार?

राधेश्याम मोपलवार हे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी नांदेड इथं ४ वर्षं जिल्हाधिकारी म्हणून सेवा

बजावली आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये देखील काही काळ त्यांनी पदभार सांभाळला

आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सहमुख्याधिकारीपदावर त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण

नियंत्रण महामंडळात ते सदस्य सचिव होते. कोकण विभागीय आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

उचलबांगडी होण्यापूर्वी ते एमएसआरडीचे एमडी आणि व्हाईस चेअरमन होते. मार्च 2018 ला होणार निवृत्त होणार

असून त्याआधीच पदावरून त्यांची गच्छंती झााली आहे.

काय आहे मोपलवारांचे नेमके प्रकरण ?

बोरिवली येथील एका प्लॉटचे काम करुन देण्याच्या बदल्यात एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक असलेले

राधेश्याम मोपलवार यांनी एक कोटी रुपयांच्या दलालीची मागणी केल्याची ऑडिओ क्‍लिप बाहेर आली होती.

ऐन पावसाळी अधिवेशनादरम्यान ही क्‍लिप बाहेर आल्याने खळबळ उडाली होती. या कथित क्‍लिपवरून विरोधकांनी

मोपलवार यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मोपलवार यांची एमएसआरडीसीतून उचलबांगडी करून त्यांची वरिष्ठ सनदी अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली एसआयटी

स्थापन करून चौकशी करण्याचे आश्‍वासन सभागृहात दिले. त्यानुसार जॉनी जोसेफ यांच्या यांच्या नेतृत्वाखाली

तपास पथक स्थापन करून चौकशी सुरू आहे.

Updated : 15 Sep 2017 8:36 AM GMT
Next Story
Share it
Top