Home > मॅक्स रिपोर्ट > जो करना है करलो, मेरे पिता CM के राईट हँड है

जो करना है करलो, मेरे पिता CM के राईट हँड है

जो करना है करलो, मेरे पिता CM के राईट हँड है
X

मुंबईत पारदर्शकतेच्या राजकारणात अडकलेल्या मुख्यमंत्र्यांना नागपूरच्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. असेल तरी कसा? जर त्यांचाच राईट हँड हे गुन्हे करत असेल तर...तुमच्या लक्षात आलंच असेल. मुन्ना यादव या गुंडा विषयीच बोलत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या नागपुरातल्या राईट हँडवर अनेक प्रकारचे आरोप झालेत. पण, त्याला हात लावण्याची पोलिसांची अजिबात हिम्मत होत नाही. अहो हात तर सोडा सधी एफआयआर सुद्धा पोलीस घेत नाही. एनसी घेऊन मामला रफादफा करतात.

बुधवारी सुद्धा असंच झालं मुन्ना यादवचा मुलगा अर्जून यादव यानं त्याच्या वर्गातल्या वरूण जांगडे याला मारहाण केली, शिवागाळ केली, त्याही पुढे जाऊन धमकी दिली. "मेरे पिता cm के राईट हैंड है, तुम्हे जो करना है करलो". कॉलेजच्या पार्कींग लॉटमध्ये झालेल्या या वादावादीनंतर वरुण पोलिसात गेला. प्रतापनगर पोलिसांनी या प्रकरणाची फक्त एनसी घेतली आणि थंड बसले. रितसर तक्रार नोंदवून घेण्याची तसदी सुद्धा पोलिसांनी घेतली नाही. अर्जुन यादवच्या विरोधात कलम 323 व 504 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांच्याच राईट हँडच्या मुलाच्या विरोधात एफआयआर करून स्वतः नोकरी धोक्यात का अणावी? असा विचार पोलिसांनी नक्कीच केला असणार. नाहीतर अपहरण, जीवे मारण्याचे प्रयत्न, परवानगी शिवाय रॅली काढणे, घरावर हल्ला करून मारहाण करणे, धमकावणे असे आरोप असलेल्या मुन्ना यादव आणि त्याच्या कुटुंबियांवर कारवाई करतांना अशी कचखाऊ भूमिका पोलिसांनी घेतलीच नसती. वेळीच मुन्ना यादवच्या मुसक्या आवळल्या असत्या.

पोलिसांची ही हतबलताच सांगते की मुन्ना यादव या गुडांवर मुख्यमंत्री कम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किती मेहेरबान आहेत ते.

Updated : 8 March 2017 6:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top