Home > मॅक्स रिपोर्ट > मुलगी झाली तर, मोफत दाढी आणि केस कटींग 

मुलगी झाली तर, मोफत दाढी आणि केस कटींग 

मुलगी झाली तर, मोफत दाढी आणि केस कटींग 
X

मुलगी झाली तर सहा महिने केस कटिंग, दाढी आणि त्याच बरोबर मुलीचे जावळ मोफत ! अशी अजब ऑफर सांगलीच्या एका सलून व्यवसायिकानं सुरु केली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संतोष जाधव यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

म्हैसाळमध्ये उघड झालेल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. पण, याच सांगलीत आत मुलीच्या जन्मानिमित्त कुठे साखर हत्तीवरून साखर वाटली जात आहे. तर कुणी न्हावी मोफत सेवा देत आहे. मिरज तालुक्यातल्या सोनी गावातील सलून व्यावसायिक संतोष जाधव यांनी बेटी बचाव, बेटी पढाव हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या कोणाला मुलगी होईल त्या बापाचे सहा महिने केस कटिंग आणि दाढी मोफत करण्याची तसेच त्या मुलीचे जावळही मोफत काढण्याची अफलातून ऑफर त्यांनी जाहीर केली आहे. ही योजना सूरु केल्यानंतर सोनी गावात पाच जणांना मुली झाल्या आहेत. हे पाच जण सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत. संतोष जाधव यांनी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाची सध्या पंचक्रोशीत जोरदार चर्चेत आहे. त्याचबरोबर या उपक्रमाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

Updated : 14 March 2017 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top