Home > मॅक्स रिपोर्ट > ‘भिऊ नका, मी पाठिशी आहे’

‘भिऊ नका, मी पाठिशी आहे’

‘भिऊ नका, मी पाठिशी आहे’
X

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सरकारविरोधात लिहिणाऱ्या व्यक्तींना नोटीसा बजावल्या गेल्या होत्या त्यावरून आज त्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय पाठवू शकतात. असा सवाल करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू, असे आश्वासनही पवारांनी यावेळी या तरूणांना दिले आहे.

दरम्यान यावेळी पवारांनी मुख्यमंत्र्यांना तुमच्या स्वत:च्या कार्यालयात काय चाललं आहे, याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

“सोशल मीडियावर लिहिणारे ७०च्या आसपास तरुण महाराष्ट्रभरातून येऊन आज मला भेटले. ते कुठल्या राजकीय विचारांचे किंवा पक्षाचे नाही. लोकशाहीचा मूलभूत अधिकार व सेक्युलरिझम या गोष्टींबाबत त्यांची भूमिका आग्रही आहे. कुठे विसंगती दिसल्यास फेसबुकवर आपली मतं ते व्यक्त करतात. परंतू या तरुणांना धमकावण्याचा जो काही प्रकार त्यांच्या भागांमधील स्थानिक पोलिसांकडून होत आहेत. यावरुन त्या तरुणांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. पक्षीय दृष्टिकोनातून नाही. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू. या तरुणांच्या विरोधात नोटिसा व खटले भरले जात आहेत. त्यासंबंधी कायदेशीर सल्लागारांमार्फत सहाय्य करण्यासाठी एक विभाग आम्ही सुरू करत आहोत". असं आश्वासन पवार यांनी या तरूणांना दिलं आहे .

दरम्यान काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ‘देव गायकवाड’ नावाच्या फेक अकाऊंट प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काही जणांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. सायबर सेलमध्ये या प्रकरणी गुन्हा क्र. 109/2017 नुसार भादवि कलम 419, 420, 465, 468, 469, 471 आणि 354D, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66C, 66D आणि 67 अन्वये या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय..

Updated : 14 Oct 2017 3:22 PM GMT
Next Story
Share it
Top