Home > मॅक्स रिपोर्ट > भिवंडीत काँग्रेस नगरसेवकाची हत्या

भिवंडीत काँग्रेस नगरसेवकाची हत्या

भिवंडीत काँग्रेस नगरसेवकाची हत्या
X

भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते मनोज अनंत म्हात्रे यांची पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी कोयत्यानं वार आणि रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून त्यांची हत्या केलीय. भिवंडीतील रामनगर येथील समर्थक उमाशंकर उर्फ मुलायम यादव यांना विरोधकांनी धमकावल्यानं त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी या मागणीसाठी म्हात्रे नारपोली पोलीस ठाण्यात गेले होते. तेथून ते ओसवालवाडी येथील राहत्या घरी आले असता दबा धरून बसलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्यानं कोयत्याने हात तोडून रिव्हॉल्वनं तीन गोळ्या झाडल्या. त्याच त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर त्यांना तातडीने ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. यापूर्वीही म्हात्रेंवर कामतघर येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती.

Updated : 15 Feb 2017 5:27 AM GMT
Next Story
Share it
Top