Home > मॅक्स रिपोर्ट > भाजपच्या सोशल मीडिया आर्मीत फिदायीन !

भाजपच्या सोशल मीडिया आर्मीत फिदायीन !

भाजपच्या सोशल मीडिया आर्मीत फिदायीन !
X

मुंबईतल्या मलबार हिल भागात भाजपचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे प्रमुख मंत्री तसंच भाजपचं सोशल मिडीया सांभाळलं जातं. इथे वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये सोशल मीडिया आर्मी बसते. या सोशल मीडिया आर्मीला विविध कामं वाटून दिलेली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सर्व भाषणांना सोशल मिडीयावर व्हायरल करणे, निगेटीव्ह कमेंटस काढून टाकणे. बोगस अकाऊंट बनवून स्वत:च पॉझीटीव्ह प्रतिक्रीया पोस्ट करणे, तसंच विरोधात लिहिणाऱ्या पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, प्रवक्ते यांना सोशल मिडीयावर ट्रोल करणे किंवा त्यांच्या पोस्टवर निगेटीव्ह कमेंट्स टाकणे. अशी विविध कामं या वॉररूम मध्ये सुरू असतात.

विरोधी पक्षांच्या नेते आणि उमेदवारांविरोधात प्रचार करणे यात काही गैर नाही. यंदा भाजपच्या या वॉररूम मधून शिवसेनेच्या विरोधात सर्वाधिक प्रचार केला गेला. शिवसेनेच्या विरोधातले सर्व कार्टून्स इथेच बनवण्यात आले.

https://youtu.be/zxWCggvzafo

सोशल मिडीयावर ज्यांच्या अकाऊंटवर जास्त फॉलोअर्स आहेत असे अकाऊंट भाड्याने घेऊन त्यावरूनही अनेक पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. Viral In India या युट्यूब अकाऊंट वरून काल-परवाच एक ॲनिमेशन सिरीजही व्हायरल करण्यात आली.

https://youtu.be/jBwenO1JSAs

data-href="https://www.facebook.com/MaxMaharashtra/"

data-width="380"

data-hide-cover="false"

data-show-facepile="false"

data-show-posts="false">

काही पत्रकार, पत्रकारीतेत नव्याने येऊ पाहणारे इंटर्न अशांच्या साह्याने ही वॉर रूम चालवण्यात येत आहे. या पत्रकारांची यादीही मॅक्समहाराष्ट्र कडे आहे, तर अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं वॉररूम कार्यरत आहे. भारतीय राजकारणातील सर्वांत प्रभावी वॉररूम किंवा सोशल मिडीया आर्मी म्हणून भाजपच्या सोशलमीडिया आर्मीचा दबदबा आहे. मात्र नेमूण दिलेलं काम करता करता या आर्मीतही फिदायीन तयार झाल्याचं दिसतंय.

मध्यंतरी गुजराती समाजाला प्रतिनिधीत्व दिलं नाही म्हणून भाजपच्या एका नेत्यांच्या विरोधात मोठं कँपेन झालं. वरकरणी मराठी-गुजराती वाद निर्माण करून शिवसेना याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतेय असं चित्र रंगवण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात ही कँपेन भाजपच्याच सोशलमिडीया सेल मधून झाल्याची मॅक्समहाराष्ट्रकडे पक्की माहिती आहे.

सोशल मिडीया सांभाळता सांभाळता राजकीय वेध लागलेल्या एकाने तिकीट नाकारलं म्हणून भाजपच्याच नेत्यांच्या विरोधात ट्रोल केलं. हा नेता कसा गुजराती विरोधी आहे असे काही कार्टून ही मलबार हिल वरून व्हायरल केले गेले. विविध फेक अकाऊंट आणि पक्षाचीच यंत्रणा वापरून भाजपलाच अडचणीत आणण्याचा प्रकार भाजपच्या सोशल मिडीया आर्मीकडून झालाय. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे. सध्या भाजपच्या सोशल मिडीया सेल मध्ये सर्रास असे प्रकार होताना दिसतायत.

चारकोप कांदिवलीचे भाजपाचे आमदार योगेश सागर हे सलग दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. स्वतः गुजराती भाषिक असलेल्या या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील पालिका प्रभागांमध्ये एकही गुजराती उमेदवार दिला नसल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे. मात्र, या अपप्रचारामागे काही नाराज असून शिवसेनेने हा अपप्रचार चालवला असल्याचे योगेश सागर यांचे मत आहे. या भागात गुजराती मराठी असा वाद नसून गुजराती माणूस भाजपाच्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर लीना पटेल या गुजराती भाषिक महिलेला उमेदवारी दिल्याने गुजराती भाषिकांना उमेदवारी दिली नसल्याचा दावा निकालात निघाला आहे, असेही त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना त्यांनी सांगितले.

  • योगेश सागर, आमदार, भाजप, चारकोप

Updated : 15 Feb 2017 10:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top