Home > मॅक्स रिपोर्ट > 'भाजपच्या विजयात 'इव्हीएम'चा हातभार'

'भाजपच्या विजयात 'इव्हीएम'चा हातभार'

भाजपच्या विजयात इव्हीएमचा हातभार
X

हार्दीक पटेल यांचा इव्हीेएम हॅक झाल्याचा आरोप

गुजरात निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं भाजपवर इव्हीएम हॅक करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत ‘ईव्हीएमशी छेडछाड करुन विजय मिळवणाऱ्या भाजपला शुभेच्छा देतोय’ असं म्हटलय. येत्या पाच वर्षात आमच्यासारख्या आंदोलनकर्त्यांवर त्यांना अत्याचार करावे लागतील. आम्ही जेलमध्ये जाण्यासही तयार आहोत. आमचं आंदोलन सुरुच राहिल.’ असं ही हार्दिकनं ठणकावून सांगितलं.

एटीएम हॅक होऊ शकतात तर इव्हीएम का नाही, असा प्रश्न विचारत इव्हीएमविरोधात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोहीम सुरु करावी, असे आवाहन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केले. पैशाच्या बळावर आणि इव्हीएमच्या जोरावर भाजपचा विजय झाल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपला ९९ व काँग्रेसला ८० जागा मिळाल्या आहेत. या निकालाबरोबर विश्लेषणही सुरू झालं आहे. गुजरातमध्ये पटेल फॅक्टर चालला नाही. हार्दिक पटेलला त्याच्या समाजानं फारसं महत्त्व दिलं नसल्याचं बोललं जात आहे

Updated : 18 Dec 2017 1:30 PM GMT
Next Story
Share it
Top