Home > मॅक्स रिपोर्ट > बुलढाण्यात एलईडीचा घोटाळा

बुलढाण्यात एलईडीचा घोटाळा

बुलढाण्यात एलईडीचा घोटाळा
X

ग्रामविकासाच्या कण्यालाच लागली कीड...

ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा समजला जातो. मात्र याच कण्याला जर कीड लागली तर गावाचा विकास हा खुंटल्याशिवाय राहत नाही. असाच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील बोरी अडगाव येथे समोर आला आहे. बनावट आणि नियमबाह्य पद्धतीने बिलाचा वापर करून ग्रामसेवक, सरपंच यांनी संगनमत करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार....

खामगाव तालुक्यातील बोरीडगाव येथील ग्रामसेवक एस. एन. खंडारे यांनी एल ई डी लाईट खरेदी मध्ये भ्रष्टाचार केल्याचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गजानन सुरवाडे, महादेव पंढरी आळेकर यांनी तक्रार दाखल केली. त्यांनतर विस्तार अधिकारी गडाक यांनी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. त्यामध्ये ग्रामपंचायतने खरेदी केलेले एलईडी लाईट हे बाजार दरापेक्षा जास्त किंमतीने खरेदी केले असून ते कोणत्या कंपनीचे आहेत याबाबत बिलावर नोंद करण्यात आलेली नाही.

लाईट हे आयएसआय (ISI) मार्कचे असल्याचा बिलावरून खात्री पटत नाही. त्याचबरोबर साहित्य बाहेर जिल्ह्यातून खरेदी करायचे असल्यास त्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु ती घेतलेली नाही आणि जोडलेले बिल देखील पक्के नसून बनावट असल्याचे निदर्शनात आल्याचा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत कुठलीच कारवाही झाली नाही. त्यामुळे भ्रष्ट ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. याप्रकरणी आम्ही ग्रामसेवक एस. एन. खंडारे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र बाहेरगावी असल्याचे उडवाउडवीचे उत्तर देऊन कॅमेरासमोर बोलण्यास अप्रत्यक्षरित्या नकार दिला आहे.

Updated : 13 Dec 2017 7:35 AM GMT
Next Story
Share it
Top