Home > मॅक्स रिपोर्ट > पाहा, केईएममध्ये शिवसैनिकांचा धुमाकूळ

पाहा, केईएममध्ये शिवसैनिकांचा धुमाकूळ

पाहा, केईएममध्ये शिवसैनिकांचा धुमाकूळ
X

मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये काही शिवसैनिकांनी कपाळावर नंबर टाकण्याच्या मुद्द्याचं भांडवल करत धुमाकूळ घालत एका ़डॉक्टरना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कपाळावर हॉस्पिटलमध्ये नंबर टाकण्यात आले होते. याच मुद्द्यावरून चार ते पाच सैनिकांनी जाऊन केईएम हॉस्पिटलमध्ये धुमाकूळ घालत केईएमचे फोरेन्सिक विभागाचे प्रमुख, डॉ. हरिश पाठक यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हरिश पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार ते नंबर टेम्पररी टाकण्यात आले होते, मात्र त्याच वेळी फोटो काढले गेल्यानं ते व्हायरल झाले. मृतांबाबत कळवळा दाखवण्यासाठी शिवसैनिक शिवसेनेचे उपरणे, शिवसेना लिहिलेली भगवी टोपी कशासाठी घालून आले होते हे मात्र समजले नाही. यांपैकी एका शिवसैनिकाने त्याचे नाव निलेश धुमाळ असे सांगितले. नेमके काय घडले ते पाहा या व्हिडीओमध्ये....

Updated : 30 Sep 2017 1:34 PM GMT
Next Story
Share it
Top