Home > मॅक्स रिपोर्ट > मुंबापुरी झाली तुंबापुरी..रेल्वे वाहतूक विस्कळीत!

मुंबापुरी झाली तुंबापुरी..रेल्वे वाहतूक विस्कळीत!

मुंबापुरी झाली तुंबापुरी..रेल्वे वाहतूक विस्कळीत!
X

मुंबई आणि उपनगरात सोमवारी सकाळपासून धुवाधार पाऊस बरसत आहे. मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी आल्याने लोकल धीम्या गतीने चालत आहेत. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील दुपारच्या सत्रातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला असून हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे अत्यंत संथ गतीने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईचा वेग अतिशय मंदावला आहे. जवळपास सर्वच भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. मुंबई आणि ठाण्यातील काही भागात १०० मिमी. ते १२० मिमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असून याकाळात गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची संततधार कायम असेल असे सांगण्यात आले आहे. येत्या ४८ तासात मुंबईसह कोकणात असाच मुसळधार पाऊस कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मुसळधार पाऊसाने मुंबई आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्याचे LATEST UPDATE खालील प्रामणे:

  • हार्बर आणि सेंट्रल रेल्वे ठप्प, पश्चिम रेल्वे विस्कळीत.
  • लोअर परेल आणि एल्फिन्स्टन स्टेशन दरम्यान रुळावर झाड पडलं, स्लो मार्गावरील रेल्वे वाहतूक फास्ट ट्रॅकवर.
  • एनडीआरएफच्या 3 टीम मुंबईत तयार, पुण्याहून आणखी 2 टीम रवाना
  • पुढील सूचनेपर्यंत मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प, CST स्टेशनवर अनाऊन्समेंट, दोन्ही बाजूच्या लोकल बंद
  • पावसामुळे मुंबईची चहूबाजूंनी नाकेबंदी, पुण्याहून NDRF च्या दोन तुकड्या मागवल्या
  • मुंबईत तुफान पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
  • सायन रेल्वे स्टेशनजवळील ट्रॅकवर पाणी साचलं.
  • तुफान पावसाने रस्त्यांना नद्यांचं रुप, दादरमधील पारसी कॉलनीत गुडघाभर पाणी.
  • सांताक्रुझ भागात गेल्या 3 तासात तब्बल 87 मिमी पावसाची नोंद.
  • कुर्ला स्टेशनवर 11.52 ची डोंबवली लोकल अद्याप आलीच नाही, मात्र रेल्वेकडून लोकल येत असल्याची केवळ अनाऊन्समेंट, तासाभरापासून लोकल नाहीच

Updated : 29 Aug 2017 8:39 AM GMT
Next Story
Share it
Top