Home > मॅक्स रिपोर्ट > धुळ्यात डॉक्टरला मारहाण, आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या

धुळ्यात डॉक्टरला मारहाण, आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या

धुळ्यात डॉक्टरला मारहाण, आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या
X

धुळे डॉक्टर मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. डॉ. रोशन म्हामुणकर यांना मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी प्रदीप वेताळेनं लॉकअपच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलीय. या प्रकरणानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. डॉक्टर म्हामुणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.

धुळे शहरातील सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. रोशन म्हामुणकर या निवासी अस्थिरोग तज्ज्ञाला रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. साक्री मार्गावर झालेल्या अपघातातील एका जखमीला या रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळी डॉ. म्हामुणकर यांनी रुग्णावर उपचार करण्यासाठी न्यूरो सर्जनची आवश्यकता असल्याचं सांगितल. पण, रुग्णालयात न्यूरो सर्जन नसल्यानं डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये शब्दीक चकमक झाली. त्यावेळी रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. म्हामुणकर यांना लाथाबुक्यांनी मारहाण सुरु केली. ज्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणी २५ पेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी ९ जणांना पोलिसांनी अटक केली.

Updated : 14 March 2017 4:29 PM GMT
Next Story
Share it
Top