Home > मॅक्स रिपोर्ट > डॉ. लहानेंच्या डोळ्यात का आले अश्रू?

डॉ. लहानेंच्या डोळ्यात का आले अश्रू?

डॉ. लहानेंच्या डोळ्यात का आले अश्रू?
X

जेजे हॉस्पिटलचे डीन आणि प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांचा आता जेजे हॉस्पिटलशी थेट संबंध संपला आहे. डॉ. लहाने यांचे आरोग्य विभागाचे सहसंचालक या पदावर प्रमोशन झाल्यामुळे त्यांनी आता जेजेच्या डीनपदाचा कार्यभार डॉ. नणंदर यांच्याकडे सोपवला आहे. याबाबत मॅक्स महाराष्ट्रशी बोलत असताना डॉ. लहाने भावुक झाले.

डॉ. लहाने गेली ७ वर्ष ७ महिने जेजे हॉस्पिटलचे डीन होते. या कालावधीत त्यांनी जेजे हॉस्पिटलला देशात पाचव्या स्थानावर आणले. हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या ५ लाखांवरून १० लाखांवर पोहचवली. नेत्रतज्ज्ञ म्हणून ़डॉ. लहानेंनी जेजे हॉस्पिटलमध्ये हजारो शस्त्रक्रिया केल्या. अनेकांना त्यांनी पुन्हा दृष्टी मिळवून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेजेचा नेत्रचिकित्सा विभाग नावारुपास आला. अनेक नेत्रतज्ज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. त्यामुळेच जेजेपासून दूर होत असताना ते भावुक झाले होते. मॅक्स महाराष्ट्रशी बोलत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

भविष्यात औरंगाबाद आणि मुंबई येथे रघुनाथ नेत्रालय म्हणून नेत्रालय उभारणार असल्याचं लहाने यांनी यावेळी सांगितले. राजकारणात जाण्याचा आपला विचार नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

https://youtu.be/EYA4nM8mDqA

Updated : 5 Oct 2017 11:30 AM GMT
Next Story
Share it
Top