Home > मॅक्स रिपोर्ट > डॉ. तात्याराव लहाने यांना ‘’मराठवाडा भूषण पुरस्कार’’

डॉ. तात्याराव लहाने यांना ‘’मराठवाडा भूषण पुरस्कार’’

डॉ. तात्याराव लहाने यांना ‘’मराठवाडा भूषण पुरस्कार’’
X

मराठवाडा लोकविकास मंच मार्फत मराठवाडा भूषण- मित्र-गौरव पुरस्काराचे रवींद्र नाट्य मंदिरात आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते “मराठवाडा भूषण” पुरस्कार देऊन डॉ. तात्याराव लहाने यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला विधानसभेचे सभापती मा. ना. श्री.हरीभाऊ बागडे (नाना) आणि महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे तसेच श्रीमती राही भिडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

आमदार विनायकराव मेटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच यावेळी नाम फाउडेंशनच्या मार्फत मराठवाड्यात शेतकऱ्यांच्याबाबतीत केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल सिने अभिनेते नाना पाटेकर यांना मराठवाडा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी महेश झगडे, दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी, आमदार भारती लाव्हेकर, एस.एम.देशमुख(पत्रकार), आय.एस अनसार शेख या सहा जणांना मराठवाडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सर्वांना मराठवाडा लोकविकास मंचामार्फत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी तात्याराव लहाने यांनी मराठवाड्यातील लोकांना दिलेला पुरस्कार म्हणजे मला माझ्या आई व वडिलांनी पाठीवर हात टाकून पुढील काम करत राहा असे प्रोत्साहान देणारा असल्याचे म्हटले. ज्या रूग्णांची सेवा केल्याने मला हा पुरस्कार मिळाला मी तो त्या सर्व रूग्णांना समर्पित करत असल्याचे भाव उद्गार यावेळी त्यांनी काढले.

https://youtu.be/K-5xK-Tgj40

Updated : 8 Oct 2017 2:35 PM GMT
Next Story
Share it
Top