Home > मॅक्स ब्लॉग्ज > डिड यू नो ?कौन है मच्छर का दुश्मन?

डिड यू नो ?कौन है मच्छर का दुश्मन?

डिड यू नो ?कौन है मच्छर का दुश्मन?
X

मुंबईत मच्छर नाही... हो मुंबईत एक जागा अशीही आहे जिथे मुंबई महापालिका एकही मच्छर टिकू देत नाही. अख्खी मुंबई मच्छरांमुळे परेशान असताना मच्छररहीत असलेली ही जागा कुठली? का नसतात तिथे मच्छर.. मॅक्समहाराष्ट्र चा स्पेशल रिपोर्ट.

मलबारहिलवर राहणारी जूही चावला असेल तर नाहीतर अंधेरीच्या लोखंडवाला मध्ये राहणारा अन्य कुणी अभिनेता असेल अगदी टाटा नाहीतर अंबानी असेल कुणालाही मच्छरांनी चावा घ्यायचे सोडले नसेल प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांना आपला प्राण गमवावा लागला. तर ऋषी कपूर, अनिल कपूर यासारख्या दिग्गजांनाही डासांनी आपला कृपाप्रसाद दिलाच. घरात डासांची पैदास सापडल्याने यातल्या अनेकांवर मुंबईच्या महानगर पालिकेने कारवाईची नोटीसही पाठवली. सर्वसामान्य मुंबईकरांची तर रूग्णालयात झालेली नोंदणीच धडकी भरवणारी आहे. अगदी मंत्र्यांचे बंगले असलेल्या मलबार हिल परिसरात एवढंच काय आपल्या विरोधी पक्षातल्या आणि पक्षांतर्गत विरोधकांनाही नामोहरम करणा-या मुख्यमंत्र्यांनाही वर्षावर झोप येत नसेल ती डासांमुळे, पण या मुंबईनगरीत एक परिसर असा आहे जिथं डास औषधालाही सापडत नाहीत. तो परिसर म्हणजे वांद्रे येथील कलानगर.

का सापडत नाहीत डास मातोश्री आणि कलानगरच्या परिसरात ?शिवसेनेच्या चित्रातल्या वाघाला डास घाबरतात की काय ? की हा त्यांच्यासाठी प्रतिबंधित विभाग आहे ? का शांत झोप लागते ठाकरे कुटूंबियांना मातोश्रीवर ? नेमके काय रहस्य आहे यामागे..

याचे कारण आहे मुंबई महापालिका आणि पालिकेत असलेली शिवसेनेची सत्ता. सत्ताधारी पक्षाच्या सम्राटांना चावायचे नाही, असा दंडक नाही मच्छरांना. पण त्यामागचे गणितच काही वेगळे आहे. या भागात मच्छरांचे पंख कधीच फडफडणार नाहीत याची काळजी घेतली जातेय. कलानगरच्या परिसरात महापालिका करतेय दररोज डास प्रतिबंधक धूरफवारणी. हो, हे खरे आहे. हे आम्ही म्हणत नाही, तर खुद्द पालिका मान्य करते.माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गुरव यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या पाच वर्षांत म्हणजे २०१२ पासून आजतागायत या परिसरात सुट्टीचे दिवस वगळता दररोज फवारणी होत असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. ही माहीती पालिकेच्या एच पूर्व विभागाचे आरोग्य अधिका-यांकडे उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षात या परिसरातील एकाही व्यक्तीला डेंग्यू अथवा मलेरियाची लागण झाल्याची माहिती सरकारी दरबारी नाही.

तर गेल्या पाच वर्षात या परिसरातील खाजगी रूग्णालयातील नोंद पाहिली तर ती अगदीच नगण्य असल्याचे लक्षात येते. डेंग्यूची लागण झालेल्या केवळ १० तर मलेरियाची लागण झालेल्या ५ रूग्णांची नोंद ही पाच वर्षांत आढळते. ही माहितीसुद्धा एच पूर्व विभागाच्या पालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी दिली आहे. गेल्या वर्षांत जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान मुंबईत डेंग्यूने २६ जणांना प्राण गमवावे लागले होते, तर ६३७६ रूग्णांना लागण झाली होती. मलेरिया रूग्णांची आकडेवारी तर वेगळीच आहे. म्हणजे मुंबईतील धारावी, रेल्वेलगतच्या झोपड्या, बांधकामे सुरू असलेली ठिकाणे, सांडपाण्याच्या जागांच्या परिसरातील सर्वसामान्य जनता डेंग्यू आणि मलेरियाने त्रस्त होत असताना त्यांचे जीव जात असताना धूर फवारणी मात्र दररोज कलानगरात होत होती हे नागडं वास्तव समोर आले आहे. खरंच मुंबईकरांनो हा दुजाभाव ही सापत्न वागणूक डिड यू नो ?

Updated : 25 Jan 2017 11:20 AM GMT
Next Story
Share it
Top