Home > मॅक्स रिपोर्ट > टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट
X

झी 24 तास

झी 24 तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुलाखत घेण्यात आली. सेना-भाजपमध्ये सध्या चाललेलं राजकारण आणि सार्वजनिक भांडणामुळे लोकांची चांगली करमणूक होतेय. सरकारनं त्यावर करमणूक कर लावावा असा चिमटा अशोक चव्हाण यांनी काढलाय. या विशेष मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी राज्यातल्या राजकारणाची पातळी मोठ्या प्रमाणात घसरल्याची खंतही व्यक्त केली...शिवाय राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

टीव्ही नाईन मराठी

टीव्ही 9 मराठीच्या चावडी (सकाळी 11 वाजता) या कार्यक्रामतसुद्धा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात आली. नोटाबंदी, शेतक-यांचं झालेलं नुकसान यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार भाजप आणि शिवसेनेला धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमधले वाद हे फिक्स आहेत. सत्ताधाऱ्यांचा हा डाव मतदारांच्या लक्षात आला असून, मतदार त्यांना पराभूत करतील असा दावा त्यांनी केला. असोसिएट एडिटर निखिला म्हात्रे यांनी या चावडीचं सूत्रसंचलन केलं. प्रोड्युसर्स आणि रिपोर्टर यांनी अशोक चव्हाणांनी विविध प्रश्न विचारले.

संध्याकाळी पाच वाजता झालेल्या चावडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब सहभागी झाले होते. असोसिएट एडिटर निखिला म्हात्रे यांनी यावेळी पारदर्शक कारभाराच्या मुद्यावरून चावडीतल्या चर्चेला सुरूवात केली. नंदलाल समितीच्या अहवालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढण्यात आलेले ताशेरे, परब यांनी पुराव्यानिशी दाखवून दिले. तसंच मुंबई महापालिकेत शिवसेनेला संपूर्ण बहुमत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पन्नास वर्षांपासून शिवसेनेचं मुंबईकरांशी नातं आहे. रूग्णवाहिका, रक्तदान अशा अनेक उपक्रमातून इथला मुंबईकर शिवसेनेबरोबर कायमचा जोडला गेलेला आहे. त्यामुळे मुंबईकर पुन्हा शिवसेनेलाच मतदान करेल असा दावा त्यांनी यावेळी केला.

साम टीव्ही

आजच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात संपादक संजय आवटे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे ते आदित्य ठाकरे व्हाया उद्धव ठाकरे असा एकंदर सेनेचा प्रवास कसा चालला आहे यावर दृष्टीक्षेप टाकण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकांच्यानिमित्तानं झालेल्या या मुलाखतीत उद्धव यांनी राज्य आणि देशाच्या राजकारणामध्ये नवे पर्याय उभे राहावेत याच्या अनुषंगानं आपली भूमिका मांडली.

Updated : 17 Feb 2017 6:25 PM GMT
Next Story
Share it
Top