Home > मॅक्स रिपोर्ट > टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट

टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट

टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट
X

सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०१७ रोजी मराठी न्यूज चॅनेल्सच्या प्राईमटाईम डिबेट शोमध्ये झालेल्या चर्चांचा सार

झी २४ तास ( रोखठोक )

झी २४ तासच्या रोखठोकमध्ये सोमवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यामध्ये संजय राऊतांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर उत्तरं दिली. तसंच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेना गृहीत धरता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचं मिशन १२५ आहे आणि स्वबळाची पक्षाची भूमिका आहे, त्यामुळे कोणासोबत युती नाही याचा पुर्नउच्चार राऊतांनी केला. सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार का? या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकार 'नोटीस पिरीयड'वर असल्याचं सूचक वक्तव्य केलंय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसात काय नवीन घडणार याकडे लक्ष द्यावं लागेल.

टीव्ही नाईन मराठी ( खास बात )

टीव्ही नाईन मराठीच्या खासबात या कार्यक्रमात सोमवारी चर्चा झाली ती शिवसेना-भाजपवर होत असलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपावर. याचर्चेत सेना-भाजपच्या प्रवक्त्यांमध्ये चांगलीच तूतूमैमै झाली. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना केलेल्या कामांपेक्षा भाजपवर टीका करण्यात शिवसेना व्यग्र असल्याचा आरोप केला त्याला शिवसेनेचे प्रवक्ते आशिष जयस्वाल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजपच जनतेमध्ये भ्रम निर्माण करत असल्याचा प्रतीहल्ला त्यांनी चढवला. तर काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजप-शिवसेना लोकांना मूर्ख बनवत आहेत, त्यांना हारवल्याशिवाय पारदर्शकता येणार नाही. असं म्हणत वाघमारे दोन्ही पक्षांच्या नैतिकतेलाच आव्हानं दिलं. तर आम्ही बोलू तेच खरं ही सेना-भाजपची सध्याची प्रवृत्ती घातक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र पवार यांनी माडलं.

महाराष्ट्र वन

महाराष्ट्र वन चॅनेलवर सोमवारी नाशिकमध्ये तिकीट देण्यासाठी भाजपकडून घेण्यात आलेल्या पैशांबाबत चर्चा झाली. घेण्यात आलेला पैसा हा पक्ष निधी होता असं भाजपचे प्रवक्ते सुहास फरांदे यांनी मान्य करताच राज्य निवडणूक आयोगाकडून त्याच्या चौकशीची मागणी शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी केली. तर नुसती चौकशी नको तर निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली. त्यावर आम्ही चौकशीला तयार आहोत अशी भूमिका सुहास फरांदे यांनी घेतली. तर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी भाजपनं घेतलेल्या पैशांचा मोड ऑफ ट्रॅन्जॅक्शन काय आहे हे तपासण्याची मागणी केलीय. चर्चा संपवतांना महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगानं सू मोटो दखल करण्याची मागणी केलीय. तसंच सर्व पक्षांवर रोखीनं व्यवहार करायला बंधन आणणाऱ्या भाजपच्या या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Updated : 6 Feb 2017 6:33 PM GMT
Next Story
Share it
Top