Home > मॅक्स रिपोर्ट > टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट

टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट

टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट
X

मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी २०१७ रोजी मराठी न्यूज चॅनेल्सच्या प्राईम टाईम डिबेट शोमध्ये झालेल्या चर्चांचा सार

झी २४ तास ( रोखठोक )

झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात किरीट सोमय्या यांची मुलाखत घेण्यात आली. मुलुंड डंपिंग ग्राऊंड प्रकरणात राहुल शेवाळेंनी उद्धव ठाकरेंचं आकृती बिल्डरसोबत सेटिंग करून दिल्याचा खळबळजनक आरोप या मुलाखतीत खासदार सोमय्या यांनी केला. तसंच मुंबई महापालिकेतल्या माफियांवर काहीच कारवाई होत नसेल तर खड्ड्यात गेली दोस्ती असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं.

टीव्ही नाईन मराठी ( चावडी )

टीव्ही नाईनच्या चावडी या कार्यक्रमात मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी सिंचन घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान कुटुंबियांना झालेल्या त्रासाबद्दल अजित पवार मोकळ्या मनानं बोलले. या त्रासामुळेच आपण आपल्या मुलांना राजकारणात न आणण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. नुसतं बोलल्यानं कुणी लोकनेता नाही होत असा टोला यावेळी अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांना लगावला. सुप्रिया सुळेंशी आपले कुठलेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर त्याचा अभिमानच वाटेल असंही अजित पवार यांनी यावेळी म्हंटलंय.

जय महाराष्ट्र ( लक्षवेधी )

जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या लक्षवेधीमध्ये मात्र मंगळवारी मोदींचं लोकसभेतील भाषण हे भाषण की दुषण? या विषयावर चर्चा झाली. त्यात काँग्रेसच्या रत्नाकर महाजन यांनी मोदींच भाषण हे खालच्या पातळीचं असल्याची टीका केली. त्याचा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी जोरजार प्रतिवाद केला. विरोधक मोदींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी लावला. विश्वंभर चौधरी यांनी मात्र मोदी भाषणात फॅक्चुअली करेक्ट माहिती मांडत नसल्याचा मुद्दा मांडून भंडारींना खिंडीत गाठलं. त्यावर भंडारींनी टी.एन.मेनन यांचा लेख वाचण्याचा सल्ला दिला. शिवसेना आमदार अनिल परब यांनी मात्र नोटबंदिचा मुद्दा लावून धरला. तर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी जाहिर सभा आणि लोकसभेत पंतप्रधानांनी फरक केला पाहिजे असा सल्ला दिला. दरम्यान पंतप्रधानांच्या भाषणानंतरही नोटबंदीबाबतच्या प्रमुख प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरीतच असल्याचं मत संपादक नीलेश खरे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मांडलं.

महाराष्ट्र वन ( आजचा सवाल )

महाराष्ट्र वनच्या आजचा सवाल या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणावर चर्चा झाली. यावेळी भाजप प्रवक्ते माधव भंडारी आणि काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्यात चांगलीच तूतूमैमै झाली. मोदी अजूनही प्रचाराच्याच मोडमध्ये आहेत. त्यांनी लोकसभेच्या व्यासपीठाचा चूकीचा वापर केला असा आरोप रत्नाकर महाजन यांनी लगावला. त्यावर माधव भंडारी यांनी काँग्रेसला जशास तशी हीच भाषा कळते असं प्रत्युत्तर दिलं. मोदींनी केलेल्या कामांचा पाढा त्यांनी यावेळी वाचला. तर काँग्रेसवर टीका करण्यासाठी मोदींनी दुसरं व्यासपीठ निवडायला पाहिजे असं मत कम्युनिस्ट नेते डी.एल. कराड यांनी माडंल. खरंतर या भाषणात मोदींनी त्यांचा पुढचा रोडमॅप सांगणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं तसं काही झालं. मोदींनी लोकांच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा दिली नाहीत असं निरिक्षण ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी नोंदवलं. एवढ्या दिवसा नंतरही काळ्या पैशाचा नेमका आकडा बाहेर आलेला नाही, दहशवादा थांबलेला नाही, विकासदर सावरलेला नाही, परिस्थिती बदलेली नाही. यावर मात्र मोदींनी उत्तरं दिलेली नाहीत असं मत कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी मांडलं.

Updated : 7 Feb 2017 5:49 PM GMT
Next Story
Share it
Top