Home > मॅक्स रिपोर्ट > जीवनदानासाठी लातूर झाले स्तब्ध...

जीवनदानासाठी लातूर झाले स्तब्ध...

जीवनदानासाठी लातूर झाले स्तब्ध...
X

लातूर: शहरानजीकच्या माळवटी गावातील किरण लोभे या वीस वर्षीय तरुणाने मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प केला होता, दुर्दैवाने काल रात्री त्याचा ब्रेन डेड होऊन मृत्यू झाला...! त्यानंतर त्याच्या शरीरावर शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीराचे महत्वपूर्ण अवयव इतरांच्या मदतीसाठी मुंबई आणि हैदराबादकड़े हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी संपूर्ण प्रशासनाला तयारीला लावले.

सुमारे 01. 30 वाजता मुंबईहून एअर ऍम्ब्युलन्स लातूरच्या विमानतळावर दाखल झाल्या. या एअर ऍम्ब्युलन्स सोबतच डॉक्टरांचं एक पथक देखील होते. अगदी वायुवेगाने हे पथक लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाकड़े दाखल झाले. सुमारे साडेचार वाजता मृत किरणचे अवयव काढून हे पथक मुंबई ला रवाना झाले. लातूर शहरात पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉरचा अनुभव लातूरकरांनी घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून लातूर शहर देखील काही वेळासाठी जागीच स्तब्ध झाले. शासकीय मेडिकल कॉलेज ते लातूर विमानतळापर्यंतचं १३ किलोमीटरचे अंतर फक्त नऊ मिनिटात पार करून लातूर प्रशासनानं आपली तत्परता सिद्ध केली आहे.

दरम्यान किरणच्या अवयव दानामुळे पाच गरजू रुग्णांना नवजीवन मिळणार असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता पवार यांनी सांगितलं आहे. तसेच आपल्या भावाचं हृदय एखाद्या गरजू व्यक्तीच्या शरीरात धडकणार असल्याने मयत किरणच्या भावानं समाधान व्यक्त केल आहे.

Updated : 27 Sep 2017 6:00 AM GMT
Next Story
Share it
Top