Home > मॅक्स रिपोर्ट > सदाभाऊंवरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल...

सदाभाऊंवरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल...

सदाभाऊंवरचा तो व्हिडीओ व्हायरल...
X

कोल्हापुुरातीस एका गणपती मंडळाच्या देखाव्यात कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना टार्गेट करण्यात आलं असून या जिवंत देखाव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी आमदार सुरेश साळोखे संस्थापक अध्यक्ष असलेल्या ताराबाई रोडवरील मित्रप्रेम गणेश मंडळात जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. शेेतक-यांच्या समस्यांवर हा देखावा असून यामध्ये एका दृश्यात भाऊ नावाचं एक पात्र दाखवलं गेलंय. हे भाऊ सरकारनं शेतक-यांसाठी केलेल्या कामाचा पाढा वाचतात. मात्र शेतकरी उलट त्यांना जाब विचारतात असं या देखाव्यात दाखवण्यात आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊंबरोबर ताणलेले संबंध पाहता असा व्हिडिओ व्हायरल न झाला तर नवल!

Updated : 5 Sep 2017 1:39 PM GMT
Next Story
Share it
Top