Home > मॅक्स रिपोर्ट > कालच्या पावसात प्रसिद्ध डॉ़क्टर बेपत्ता

कालच्या पावसात प्रसिद्ध डॉ़क्टर बेपत्ता

कालच्या पावसात प्रसिद्ध डॉ़क्टर बेपत्ता
X

मुंबईच्या मंगळवारच्या जलप्रलयात बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले आहेत. डॉ. अमरापूरकर मॅनहोलमध्ये पडले असल्याची शक्यता आहे.

मंगळवारी दुपारी 4.30 वाजता डॉ. अमरापूरकर बॉम्बे हॉस्पिटलमधून प्रभादेवीला घरी निघाले. वाटेत एल्फिन्स्टन रोड परिसरात दीपक टॉकीजजवळ त्यांची गाडी पावसामुळे ट्रॅफिकमध्ये अडकली. बराच वेळ गाडी एकाच ठिकाणी थांबून राहिल्यामुळे ते संध्याकाळी 6.30च्या दरम्यान गाडीतून उतरले आणि पायी घराकडे निघाले. ड्रायव्हरला त्यांनी घराकडे येण्यास सांगितले. मात्र ड्रायव्हर घरी पोहचला तरी डॉ. अमरापूरकर घरी पोहचले नव्हते. त्यांचा संपर्कही होत नव्हता. ज्या परिसरात ते उतरले होते, तिथे शोध घेतला असता एका मॅनहोलजवळ त्यांची छत्री सापडली, मात्र त्यांचा शोध लागलेला नाही. डायव्हर्सच्या मदतीने डॉ. अमरापूरकरांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Updated : 30 Aug 2017 8:37 AM GMT
Next Story
Share it
Top