Home > मॅक्स रिपोर्ट > कमला मिल्स अग्नितांडवाचा अहवाल आणि काही अनुत्तरीत प्रश्न...

कमला मिल्स अग्नितांडवाचा अहवाल आणि काही अनुत्तरीत प्रश्न...

कमला मिल्स अग्नितांडवाचा अहवाल आणि काही अनुत्तरीत प्रश्न...
X

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स मधील लागलेल्या अग्नितांडवाचा अग्निशमन दलाचा अहवाल समोर आला असून, या अहवालात मोजो पबमधून आगीला सुरुवात झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. हुक्क्यातील कोळश्याची ठिणगीच या आगीला कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

हुक्कयातील कोळश्याची ठिणगीनेच केले आग्नितांडव

अग्निशनम दलाच्या अहवालानुसार, हुक्क्याच्या कोळश्याची ठिणगी पबमधील पडद्यावर पडली आणि या ठिणगीनेच ही आग लागली. त्यानंतर या आगीचे लोण वाढत गेले आणि रुफ टॉपवर असलेल्या वन अबव्हचा या आगीनं ताबा घेतल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालात आग लागली तेव्हा घटना स्थळी उपस्थित असलेले ग्राहक, सुरक्षारक्षक तसेच घटनास्थळी पहिल्यांदा पोहोचलेले अग्निशमन दलाचे जवान यांनी दिलेली माहिती आणि घटनास्थळाची पाहणी या सर्व बाबींचा विचार करण्यात करण्यात आल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.

काय आहे अहवालात?

मोजो रेस्टॉरंटचा उजवीकडील आणि वन अबव्हचा संपूर्ण भाग छताने बंदिस्त होता. छतासाठी वापरलेले सर्व साहित्य- बांबू, प्लायवूड, कॉटन आणि नायलॉनचे पडदे, टार्पोलिन (प्लास्टिक), कारपेट याचा वापर केला गेला होता. आग लागलेल्या रात्री मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन्ही उपाहारगृहातील गच्चीवर ज्वालाग्राही हुक्का आणि कोळशाचे निखारे मोठय़ा प्रमाणात वापरले जात होते. दोन्ही उपाहारगृहात दक्षिण पूर्व भागात हुक्का तयार केला जात होता. उपाहारगृहात २०० ते ३०० लोक उपस्थित होते. व्हिडीओ, फोटो, समाजमाध्यमांवरील नागरिकांचे संदेश आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोजो बिस्ट्रो उपाहारगृहात आग लागली आणि मग वन अबव्ह उपाहारगृहात पसरली, असे अग्निशमन दलाने अहवालात म्हटले आहे.

काही प्रश्न अनुत्तरीतच

अग्नीशमन दलाच्या अहवालानंतरही काही प्रश्न या अग्नितांडवासंदर्भात काही प्रश्न येथे उपस्थित होत आहेत. ‘जी' वॉर्डमधील ऑफिसरची बदली ईस्ट वॉर्डमध्ये कोणी केली? आणि ईस्ट वॉर्डात असलेल्या जैन ऑफिसरची 'जी' वॉर्डमध्ये बदली करणार कोण? जी वॉर्डातील अॉफिसरची कमला मिल्स मधील सगळ्या अवैध रेस्टॉरेंट आणि बारला मंजूरी देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पंरतु पालिकेने या अग्नितांडवामुळे ज्या ५ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, त्यातील ३ जण तर ‘जी’ वॉर्डामध्ये कार्यरत ही नाहीत. तर मग पालिकेने त्या तीन जणांना निलंबित का केले? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

Updated : 6 Jan 2018 6:50 AM GMT
Next Story
Share it
Top