Home > News Update > एकाच घरात दोन खासदार नको म्हणून एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी नाकारली?

एकाच घरात दोन खासदार नको म्हणून एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी नाकारली?

एकाच घरात दोन खासदार नको म्हणून एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी नाकारली?
X

भाजपचे नाराज असेलेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंच पुनर्वसन करण्यासाठी राज्यसभेची उमेदवारी देण्याची तयारी राज्य नेतृत्वाने घेतली होती. तसं उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांच्याबरोबर खडसेंचं नावही सुचवण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी औरंगाबाद येथील भागवत कराड यांचं नाव भाजपच्या दिल्ली हायकामंडनं फायनल केलं.

एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे ह्या लोकसभेत खासदार आहेत. सासरे एकनाथ खडसेंनाही राज्यसभेची उमेदवारी दिली तर एकाच घरातील दोन खासदार तसंच घराणेशाहीबाबत पक्षाला टीकेला समोर जावं लागेल म्हणून खडसेंची उमेदवारी दिल्ली हायकामांडनं नाकारली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मध्यंतरी खडसेंना राज्यपालपद देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खडसेंच्या राज्यपाल पदालाही ब्रेक लावला असल्याचंही बोललं जातं.

एकनाथ खडसेंना विधान परिषदेची आमदारकी आणि विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होण्याची सुप्त इच्छा आहे. मात्र विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील अंतर्गतवाद सर्वश्रृत आहे. सरकारला कोंडीत पकडताना खडसे-फडणवीस यांच्या वक्तव्यात, समन्वयात अंतर असेल तर पक्षच अडचणीत येईल. त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होईल. यामुळं भाजपमध्ये दोन सत्ताकेंद्र नको असाही एक मतप्रवाह आहे.

खडसेंपेक्षा ज्युनिअर असलेल्या प्रवीण दरेकरांकडे विरोधीपक्षनेतेपद असल्याने खडसे त्यांचा नेतृत्वात काम करतील का? हा एक प्रश्न आहे. यामुळं विधानपरिषदेची दारही खडसेंना अजूनही दूरच आहेत.

खडसेंची प्रतिक्रिया -

राज्यसभेसाठी आपण कधीच उमेदवारी मागितली नव्हती. कार्यकर्त्यांनी मागणी केली असेल, असं सांगत जास्त बोलण्याचं एकनाथ खडसेंनी टाळलं. दरम्यान एकनाथ खडसे शांत बसणारे राजकारणी नाहीत. भाजपच्या नेत्यांनी शांत राहण्याचा सल्ला दिला असेल म्हणून त्यांनीही अजूनही ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

Updated : 13 March 2020 5:37 AM GMT
Next Story
Share it
Top