Home > मॅक्स रिपोर्ट > अखेर मराठी माणसाला 'अक्कल' आली

अखेर मराठी माणसाला 'अक्कल' आली

अखेर मराठी माणसाला अक्कल आली
X

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या सिनेमात शिवाजी महाराज दिनकर भोसलेंना स्वप्नात भेटतात. भोसले महाराजांपुढे मराठी माणसाची कैफियत मांडतात. त्यावर महाराज चिडतात. मराठी माणसाच्या "ठेविले अनंते तैसेचि राहावे" या स्वभावावर बरसतात. "आमची शाखा कुठेही नाही" ही गर्वाने सांगायची नाही तर लाज बाळगायची बाब आहे असं दिनकररावांना सांगतात.

बरं, आता यावेळी ही कथा सांगण्याचं प्रयोजन असं की, पुण्यात चितळे बंधूनी आपली वामकुक्षी टाळून पुणेकरांना भरदुपारी १ ते ४ दरम्यानही आपली चविष्ट भाकरवडी उपलब्ध केली आहे. गेली कित्येक वर्ष या १ ते ४ बंदमुळे पुणेकर चितळेंच्या चवदार पदार्थांना मुकत होते. पण आता मात्र चितळेंनी दुपरीही उघडं रहाण्याचा निर्णय घेतल्याने समस्त पुणेकरांच्या वतीनं त्यांचे जाहीर अभारच मानायला हवेत.

वर उल्लेख झाल्याप्रमाणे "आमची कुठेही शाखा नाही", "आम्ही १ ते ४ बंद राहू" अशा खोट्या प्रतिष्ठेत आणि दांभिक कल्पनांमध्ये मराठी माणूस अडकला होता. सिनेमात महाराज म्हणतात तसं या गोष्टी अभिमानाने सांगायच्या नाहीत तर लाज वाटण्याच्या आहेत. मराठी माणसाला धंदा करता येत नाही, ही समजूत मराठीयांच्या अशा स्वभावामुळे अधिक दृढ होत होती. ती या निमित्ताने का होईना काहीशी पुसली जाईल.

Updated : 14 May 2017 4:29 PM GMT
Next Story
Share it
Top