Home > मॅक्स किसान > २ दिवसांत फरकेची रक्कम भरली तरच कर्ज माफ

२ दिवसांत फरकेची रक्कम भरली तरच कर्ज माफ

२ दिवसांत फरकेची रक्कम भरली तरच कर्ज माफ
X

राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा जीआर काढलाय, या जीआरनुसार शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे, पण दीड लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी वरची रक्कम आत्ताच दोन दिवसांत बँकेत भरायची आहे, तेव्हाच त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सरकारी जीआरमध्ये या वनटाईम सेटलमेंट म्हणून येत्या 30 तारखेपर्यंत म्हणजेच दोन दिवसांत शेतकऱ्यांना दीड लाखांच्या वरची रक्कम बँकेत भरायची आहे, तेव्हाच या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फायदा होणार आहे.

नापीकी, दुष्काळ आणि शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे राज्यातले शेतकरी संकटात आहे, राज्यात दीड लाखांच्या वर कर्ज असलेले आठ लाख शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांनी वरची रक्कम दोन दिवसांत भरली नाही, तर त्यांना राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. ऐण खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांकडे पेरणीसाठीसुद्धा पैसे नाहीत, अशा वेळेस कर्जमाफीसाठी दीड लाखांच्या वरची रक्कम दोन दिवसांत शेतकरी कुठुण आणणार हा मोठा प्रश्न आहे. पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांकडे पैसे नसतात, हे सरकारला माहित आहे, मग मुद्दाम आठ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यासाठी सरकारनं जीआरमध्ये हा निकष टाकला का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.

Updated : 28 Jun 2017 1:18 PM GMT
Next Story
Share it
Top