Home > मॅक्स किसान > सांगलीत शेतकऱ्यांनी घेतले स्वतःला गाडून

सांगलीत शेतकऱ्यांनी घेतले स्वतःला गाडून

सांगलीत शेतकऱ्यांनी घेतले स्वतःला गाडून
X

क्षारपड जमिनीचा विकास होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं आहे. आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून सांगली नजीकच्या नांद्रे गावातील मातंग समाजाच्या २६ शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. मातंग समाजातील या शेतकऱ्यांना इनामी वतन म्हणून सुमारे १०० एकर जमीन मिळाली आहे. मात्र ही जमीन क्षारपड बनल्याने याचा काहीच उपयोग शेतकाऱयांना करत येत नाही. अनेक वर्षांपासून या जमिनीचा विकास करून देण्याची त्यांची मागणी आहे. पण, सरकार दुर्लक्ष करत आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारनं तातडीने त्यांच्या मागण्यांचा गंभीर विचार केला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

Updated : 14 April 2017 10:33 AM GMT
Next Story
Share it
Top