Home > मॅक्स किसान > संत्रा मार्केटवर आजही नोटाबंदीचा परिणाम!

संत्रा मार्केटवर आजही नोटाबंदीचा परिणाम!

संत्रा मार्केटवर आजही नोटाबंदीचा परिणाम!
X

​आंबिया बहाराच्या संत्र्याचं यंदा फक्त 20 ते 25 टक्केच पीक आलंय, त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नागपूरच्या संत्रा मार्केटमध्ये संत्र्यांची आवक कमी आहे, असं असतानाही यंदा संत्र्याची अपेक्षित दरवाढ झाली नाही. नोटाबंदीनंतर शेतकरी आणि व्यापारी आजही रोकड रक्कमेची मागणी करतात, ऑनलाईन व्यवहाराकडे शेतकऱ्यांचा कल नाही, त्यामुळे त्याचा परिणाम संत्र्याच्या दरावर झालाय. सध्या आवक कमी असल्याने संत्र्याचा दर 35 हजार रुपये टन असनं अपेक्षित होतं, पण वर्षभरानंतरही नोटबंदीच्या परिणामानं सध्या नागपूरच्या बाजारात संत्र्याचा दर 22 ते 25 हजार रुपये टन आहे.

Updated : 3 Nov 2017 3:36 PM GMT
Next Story
Share it
Top