Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांनो कचऱ्यापासून कसे कमवाल पैसे...

शेतकऱ्यांनो कचऱ्यापासून कसे कमवाल पैसे...

शेतकऱ्यांनो कचऱ्यापासून कसे कमवाल पैसे...
X

भारतात दररोज निर्माण होणारा कचरा आणि अॅग्रो वेस्ट नष्ट करण्याचं मोठं आव्हाण आहे. हा कचरा नष्ट करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करावे लागतात. शिवाय प्रदुषण होत असल्यानं पर्यावरणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झालाय. यावर उपाय म्हणून नागपुरातील संजीवनी अॅग्रो मशिनरी या कंपनीनं "फास्ट पायरोलिसीस सिस्टीम' चा अभ्यास करून "संजीवनी बायोऑईल गॅस, कार्बन सिस्टीम' विकसीत केली आहे. या मशिनच्या माध्यमातुन कचरा नष्ट करण्यासाठी खर्च करावे लागणारे कोट्यावधी रूपये वाचणार तर आहेच, तसंच कोट्यावधी रूपये कमवता देखील येणार आहेत. शिवाय प्रदुषण होणार नसल्यानं पर्यावरण संतुलन ठेवण्यासही मदत होणार आहे.

मशिन्सच्या माध्यमातुन एक किलो कचऱ्यापासून 400 ग्रॅम ऑईल, 400 ग्रॅम अॅक्‍टिवेटेड कार्बन आणि 200 ग्रॅम गॅसची निर्मिती करता येते. आज शहरातील कचरा आणि त्याची विल्हेवाट हा मोठ्या प्रश्‍न आहे. एकट्या नागपूरात महिन्याला 400 ते 500 टन कचरा निर्माण होतो. त्यामुळं महापालिका किंवा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांनी या मशिन्सचा उपयोग केला, तर त्यांचा खर्च वाचून उत्पन्नात वाढ होऊ शकते. ग्रामीण भागातही पाला पाचोळा, तुराटी, पऱ्हाटी, बांबुचं वेस्ट तसंच इतर अॅग्रो वेस्ट मोठ्या प्रमाणात निघते. त्यामुळं ग्रामीण विभागातही ग्रामपंचायत किंवा शेतकऱ्यांच्या समूह प्रयत्नातून ही प्रणाली लावून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतात.

https://youtu.be/mH9PNLtJQ9g

Updated : 10 Nov 2017 1:36 PM GMT
Next Story
Share it
Top