गुजरातमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या महिलेला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर येथे महिला पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अंजना भाऊ घोडविंदे असं या महिला पोलीस पाटलाचा नाव आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापुरात महिला पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ओळखीच्या चार पुरुषांनी हा हल्ला केला आहे. शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरांगण गावात हा हल्ल्याचा प्रकार घडला आहे. जमिनीच्या वादातून महिला पोलीस पाटलावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अंजना भाऊ घोडविंदे यांच्या ओठाला, हाताला आणि पायाला जबर मार लागल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दत्तात्रय मालू लकडे, तानाजी मालू लकडे, ज्ञानेश्वर दत्तात्रय लकडे आणि महेश दत्तात्रय लकडे हे या हल्ल्यातील हल्लेखोर आहेत. हे सर्व सर्व हल्लेखोर एकाच कुटुंबातील असून खरांगण गावातीलच रहिवाशी आहेत.दरम्यान, हल्ला करणारे चारही जण अद्याप मोकाट असल्याने शहापुरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Updated : 4 Jun 2019 2:53 PM GMT
Next Story