विरोधकांनी जाळला अर्थसंकल्प

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी अर्थमंत्र्यांनी बजेट मांडून झाल्यानंतर बजेटच्या प्रती जाळल्या आहेत. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील, राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मिळून या प्रती जाळल्या आहेत. विधान भवनाबाहेर विरोधकांनी त्यांचा हा रोष  व्यक्त केला आहे. संपूर्ण बजेट भाषणा दरम्यान विरोधकांनी गदारोळ केला. टाळ आणि मृदुंगाच्या गरजात त्यांनी त्यांचा विरोध दर्शवला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी विरोधकांना वेगवेगळे टोले देखील हाणले.