विरोधकांची घोषणाबाजी थांबते तेव्हा…

605

राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असतांना विरोधकांनी सतत घोषणाबाजी चालू ठेवली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जराही उसंत घेऊ न देता विरोधकांचा विरोध सुरु होता. अगदी टाळ वाजवून आणि मोठ्यामोठ्याने घोषणा देवून गदारोळ सुरु होता. या गदारोळातच सुधीरभाऊ अर्थसंकल्प मांडत होते. अर्थसंकल्पाचा भाग 1 संपला तरी विरोधकांची घोषणाबाजी काही संपत नव्हती. भाग 2 म्हणजे करप्रणालीचा भाग. तो सुरु झाला तरी गदारोळ सुरुच राहीला. पण एक क्षण असा आला की, विरोधकांच्या घोषणा थांबल्या. का थांबल्या असाव्यात घोषणा, विरोधकांचे समाधान झाले का, सरकारने कर्जमाफी केली का, विरोधकांचा घसा सुकला का, नाही. यापैकी काही झाले नव्हते तर, अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला होता, मद्य. मद्यावरील कर 23 टक्क्यांवरुन 25.93 टक्के करण्यात आल्याची घोषणा सुरु असतांना विरोधकांचे प्राण जणू कानात गोळा झाले होते. विधानसभा अध्यक्षांनी विचारले, अरे, शांत का झालात, पण ही घोषणा संपवून अर्थमंत्री पुढील मुद्द्याकडे वळताच विरोधकांनी पुन्हा बेंबीच्या देठापासून ओरडायला सुरुवात केली.