Home > मॅक्स किसान > राज्यात लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी?

राज्यात लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी?

राज्यात लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी?
X

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकार विचार करत आहे. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. कर्जमाफीचं योग्य प्लॅनिंग सुरू आहे. यूपीमध्ये झालेल्या कर्जमाफीचा अभ्यास केला जात आहे. त्याचं मॉडेल नेमकं काय आहे याचा अभ्यास करण्याचे आदेश अर्थ सचिवांना दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.

कर्जमाफीच्या संदर्भात विधानसभेत चर्चा झाली. त्यावर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. सोमवारी पनवेलमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी निर्वाणीचा इशार राज्य सरकारला दिला आहे. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीसाठी आवाज उठवला जात आहे.

Updated : 5 April 2017 8:05 AM GMT
Next Story
Share it
Top