राजस्थानात महाराष्ट्र पोलिसांचा डंका

राजस्थानच्या जोधपूरमध्ये झालेल्या सातव्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांच्या टिमनं दुसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. राजस्थानच्या टिमला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर एनएसजीच्या टिमचा तिसरा क्रमांक आला आहे. ६ फेब्रुवारी २०१७ ते ११ फेब्रुवारी २०१७ दम्यान सहा दिवस ही स्पर्धा चालली. शुटींग, ब्रिफींग, ऍब्स्टॅकल, रनिंग, फायरींग, होस्टेज रेस्क्यू आणि बिल्डींग क्लिअरन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. त्यात जंगल ऑपरेशन्समध्ये महाराष्ट्राच्या टीमला प्रथम क्रमांक मिळाल आहे. देशभरातल्या पोलीस फोर्सच्या एकूण १५ टिम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. शिवाय सीपीओ, बीएसएफ, सीआयएसएफ, एसएसबी, आयटीबीपी आणि आसाम रायफल्सच्या टिम सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.