यूपीत पुन्हा ‘मोदी’ त्सुनामी

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी नावाची त्सुनामी आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे दिसलं होतं. तेच चित्र आता यूपीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आलंय. ४०३ पैकी ३२४ जागा जिंकून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी यूपीमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. सपा आणि काँग्रेसच्या वाट्याला फक्त 55 जागा आल्या आहेत. तर मायावती यांच्या बसपला 19 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

यूपीच्या या निवडणुकांकडे सर्वजण येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातून पाहत होते. या निकालांनी या सर्वांच्या डोक्यातलं चित्र आता स्पष्ट केलं आहे. जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांच याबाबतचं ट्विव फारच बोलकं आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये ११७ पैकी ७७ जागा जिकून काँग्रेस बाजी मारली आहे. इथं अकाली दल आणि भाजपच्या पारड्यात फक्त १८ जागा पडल्या आहेत. पंजाबमध्ये आम्हीच सत्ते येऊ अशी हावा केलेल्या आम आदमी पार्टीला २० जागच मिळाल्या आहेत.

उत्तराखंडमध्ये ७० पैकी ५७ जागा जिंकून भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस पक्ष फक्त ११ जागांसाठी मर्यादित राहीला आहे.

तर तिकडे मणिपूरमध्ये २७ जागा मिळवून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं मणिपूरमध्ये सुद्धा खवखवीत यश मिळलं आहे. इथं भाजपला २१ जागा मिळाल्या आहेत. एनपीएफला ४ जागा  मिळाल्या आहेत. ७ जागी मात्र अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार जिंकले आहेत. इथं बहुमताच्या आकड्यापासून काँग्रेस ४ जागांनी दूर आहे.

गोव्यात देखिल ४० पैकी १७ जागा मिळवून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इथे सुद्धा काँग्रेस बहुमतापासून ४ जागा दूर आहे. गोव्यात भाजपला १३ जागा मिळाल्या आहेत. १० जागी इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत.