Home > मॅक्स किसान > 'युपी पॅटर्न'चा अभ्यास...बाबो फक्त थूक लावली !

'युपी पॅटर्न'चा अभ्यास...बाबो फक्त थूक लावली !

युपी पॅटर्नचा अभ्यास...बाबो फक्त थूक लावली !
X

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. त्यानंतर राज्यात आधीपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीनं जोर धरला. देवेंद्र फडणवीस सरकारवर कर्जमाफीसाठी दबाव वाढला. स्वतः बळीराजा, वेगवेगळ्या शेतकरी संघटना, विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकमुखानं कर्जमाफीची मागणी लावून धरली. त्यावर देवेंद्र सरकार पहिल्यांदाच बॅकफूटवर गेलं. आता करायचं काय असा प्रश्न पडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी बचावात्मक पवित्रा घेत यूपी पॅटर्नचा अभ्यास करू असं जाहीर केलं.त्यानंतरही सरकार यूपी पॅटर्नचा अभ्यास करत असल्याचं सतत सांगितलं.bत्यावर राज्य सरकारचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे याची विचारणा करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे रवींद्र आंबेकर यांनी आरटीआय दाखल करून खालील प्रश्न विचारले.

१) राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत यूपी पॅटर्नचा अभ्यास करण्याबाबत राज्य सरकारने घोषणा केली होती. या अभ्यास समिती-गट स्थापनेच्या जीआरची प्रत मिळावी ही विनंती

२) हा अभ्यास करत असलेल्या अधिकारी-लोकप्रतिनिधींची नावे व पद यांची माहिती मिळावी

३) कुठल्या कुठल्या मुद्दयांच्या आधारे अभ्यास सुरू आहे याची रुपरेषा कळणे बाबत

४) अभ्यास कुठपर्यंत आला आहे याची माहिती मिळणे बाबात

५) अभ्यासात काय निष्पण्ण झाले याची माहिती मिळणे बाबत.

या प्रश्नांवर मुख्यमंत्री कार्यालयानं सहकार खातं याबाबतच उत्तर देईल असं पहिलं पत्र पाठवलं. त्यानंतर सहकार व पणन खात्यानं उत्तराचं पत्र पाठवलं. त्यात “कर्जमाफीच्या यूपी पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी कुठलीही समिती किंवा गट स्थापन करण्यात आलेला नाही, त्यामुळे याची माहिती देता येत नाही“ असं उत्तर देण्यात आलं आहे. यावरून राज्य सरकारनं कुठलाही अभ्यास न करता कर्जमाफीची घोषणा केल्याचं स्पष्ट होत आहे.

Updated : 28 Jun 2017 8:44 AM GMT
Next Story
Share it
Top