मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या ?

20377

औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळीमाळी येथे विष्णू बुरकुल या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघड झाली आहे. बरकुळ महिंद्रा फायनान्स आणि बँकेच्या कर्जामुळं त्रस्त होते. महिंद्रा फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून झालेली ही टाकळीमाळी गावातील दुसरी आत्महत्या आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा कर्जमाफीकडे लागल्या आहेत.कर्जमाफी केली तर विकास कामं रेंगाळतील. तसंच कर्जमाफी केलीच तरीशेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत याची हमी घेता का? असा सवाल विधानसभेत कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलाय. मुख्यमंत्र्यांचं हेच भाषण बुरकुल यांनी गुरुवारी रात्री ऐकलं होतं असं त्यांचे जवळे लोकं सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे त्यांच्या निराशेत भर पडून त्यांनी रात्री शेतात जाऊन आत्महत्या केल्याचं त्यांच्या जवळच्या लोकांच म्हणणं आहे. मात्र, नातेवाईकांच्या आरोपाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.