Home > मॅक्स किसान > मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाचं संकट?

मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाचं संकट?

मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाचं संकट?
X

दुष्काळाच्या छायेत मराठवाडा

मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पुन्हा एकदा दुष्काळाचं संकट आ वासून उभं आहे. जुलैच्या पंधरवाड्यानंतर जवळपास २२ दिवस लोटले मराठवाड्यात पावसाचा पत्ता नाही. राज्यात औरंगाबाद विभागात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक कमी पाऊस पडलाय, औरंगाबाद विभागात जुलै महिन्यात सरासरीच्या फक्त ३६ टक्के पाऊस पडला आणि तोही पाऊस काही दिवसांत पडला. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाने दांडी मारली आहे. याचा सर्वाधिक फटका खरीप पिकांना बसतो आहे. अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकं सध्या सुकण्याच्या स्थितीत आहे. सतत तीन वर्षांतल्या दुष्काळाचे चटक आजही मराठवाड्यातला शेतकरी सहन करतोय, आता पुन्हा एकदा दुष्काळाचं संकट उंबरठ्यावर आ वासून उभं आहे.

मराठवाडा-विदर्भाच्या काही भागात साधारण अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकं सध्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस आला नाही, तर पिकं हातंची जाण्याची दाट शक्यता आहे. कापसाचा बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागावर दुष्काळाचं सावट आहे. या भागातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. जूनच्या शेवटी पावसानं दांडी मारल्याने काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी सुद्धा केली, या शेतकऱ्यांवर खर्चाचा मोठा भुर्दंड बसला आहे.

विदर्भ - मराठवाड्यात जुलैचे पहिले १०-१२ दिवस पाऊस आला नाही, मग जुलै १५ तारखेच्या आसपास चांगला पाऊस झाला, पण त्यानंतर २२ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे, पावसानं दडी मारलीय.

मराठवाड्य़ात जुलै महिन्यात किती पाऊस पडला त्यावर एक नजर टाकूया

जुलै महिना...

जिल्हा पाऊस

औरंगाबाद ४१ टक्के

जालना ३६.६ टक्के

बीड ३७.८ टक्के

लातूर ३६.९ टक्के

उस्मानाबाद ३४.९ टक्के

नांदेड ३९.६ टक्के

परभनी २९.७ टक्के

हिंगोली ३५.९ टक्के

जुलै महिन्यात मराठवाड्यात फक्त ३६.७ टक्के पाऊस पडलाय.... आतापर्य़ंत मराठवाड्यात सरासरीच्या ४५ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट आहे, ऐवढी मोठी तुट असल्यामुळेच सध्या पिकं पाणी करत आहेत. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे, येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर सरकारला दुष्काळी मदतीसाठी पावलं उचलणं गरजेचं आहे.

Updated : 8 Aug 2017 10:50 AM GMT
Next Story
Share it
Top