Home > मॅक्स किसान > मध्य प्रदेशातील धरणामुळे नागपूरात पाणीबाणी

मध्य प्रदेशातील धरणामुळे नागपूरात पाणीबाणी

मध्य प्रदेशातील धरणामुळे नागपूरात पाणीबाणी
X

विदर्भातील धरणांमध्ये ३७ टक्के पाणी शिल्लक

विदर्भ सध्या जलसंकटाचा सामना करतोय, ऐन हिवाळ्यातच या पाणीसंकटाचे चटके लागायला सुरुवात झालीय. या संकटात भर म्हणून मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्याचा आधार असलेल्या तोतलाडोह-पेंच धरणात आता फक्त ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहेत. सिंचनासाठी पाणी मिळत नसल्यामुळे आज नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आक्रोश पहायला मिळाला. शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली, यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि काँग्रेस आमदार सुनिल केदार यांचीही उपस्थिती होती. रब्बी हंगामासाठी एक पाणी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय, पण त्यावरंही शेतकरी समाधानी नाही. आणि शेतीला जास्त पाणी दिलं, तर नागपूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाची पिण्याच्या पाण्याला पहिली पसंती आहे. याच पाणीबाणीमुळे नागपूर महानगरपालीकेच्या पाणीवापराचं ऑडीट करण्याचे आदेश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिलेय, महापालिकेचं ३० टक्के पाणी वाया जात असल्याची बाब राजेंद्र मुळक यांनी लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनानं नागपूरातील पाणी वापराच्या ऑडीटचा आदेश दिलाय.

विदर्भातील नागपूर विभागात एकूण लघू, मध्यम आणि मोठी मिळून ३८५ धरणं आहेत, या धरणांमध्ये सध्या फक्त ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, गेल्यावर्षीपेक्षा यंदा नागपूर विभागात १४ टक्के पाणीसाठा कमी आहेत, तर अमरावती विभागातील एकूण ४४३ धरणांमध्ये सध्या अवघा ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अमरावती विभागात निम्माच पाणीसाठा

शिल्लक आहे. म्हणजेच सपूर्ण विदर्भातील धरणांमध्ये आता फक्त ३७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर काही भागात रब्बीचं पीक आणि सात महिन्यांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवायची आहे. हिवाळ्यातच या पाणीटंचाचे चटके लोकांना लागायला सुरुवात झालीय.

Updated : 27 Nov 2017 11:40 AM GMT
Next Story
Share it
Top