भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार ?

310
19 आमदारांच्या निलंबनानंतर राजकीय समीकरणांवर भाजपाच्या कोर कमिटीची बैठक झाली.  या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आणि भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने राजकीय डावपेचांवर चर्चा केली. काँग्रेसचे 15 आणि एनसीपीचे 14 आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. या आमदारांना आता पक्षात घ्यायचे की मध्यवर्ती निवडणूकांना सामोरे जायचं याबद्दल चर्चा करण्यात आली. या 30 पैकी 22 आमदार मध्यवर्ती निवडणूकीमध्ये पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे. याबाबत झालेली चर्चा नवी दिल्लीला कळविण्यात येणार आहे आणि  त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. भाजपाला एकला चलो रे पुढे ठेवायचे असल्याने शिवसेनावर मात करण्यासाठी पुढची व्युहरचना केली जात आहे.