भाजपच्या निष्ठावतांचा उद्रेक

323

महापालिका निवडणुकांमध्ये भाजपकडून निष्ठावंतांना डावलण्याचे प्रकार सुरूच आहेत. मुंबईत आयारामांना संधी दिल्यानंतर तिथल्या निष्ठावंतांची नाराजी दूर करतांना मुख्यमंत्र्यांची चांगलीच दमछाक होतेय. त्याचा पुढचा अध्याय पुण्यात लिहीला गेलाय.

पुण्यात पक्षानं तिकीट नाकारलं म्हणून निष्ठावंतांनी आंदेलन सुरू केलंय. त्यातचं काही नाराजांनी शहर भाजप अध्यक्ष योगेश गोवावले यांचे बॅनर्स फाडलेत. तर काही डावलेल्या इच्छुक उमेदवारांनी गोगावले यांच्या फोटोला काळं फासलंय. त्यामुळे या पोस्टरजवळ पोलिसांना तैनात करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली आहे.