बुलडाण्यात डॉक्टरा विरूद्ध विनयभंगाची तक्रार  

       आपल्याच क्लीनिकमध्ये कंपाउंडर असलेल्या एक अठरा वर्षीय तरुणीचा डॉक्टरने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी या युवतीने आरोपी डॉक्टर व त्याच क्लीनिकमध्ये काम करणाऱ्या तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून तीनही अरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमूळे पीड़ित युवती व तिच्या परिवाराने न्यायाची मागणी केली आहे.
   खामगाव येथे  डॉक्टर राजेश अरबट याचे सोनोग्राफी आणि एक्षरे क्लीनिक आहे. ज्यामध्ये स्थानिक युवती आणि इतर तीन कर्मचारी काम करतात. डॉक्टर राजेश अरबट यांनी पीड़ित युवतीला हात धरून जवळ बोलावून मोबाईलमधील तिचे फोटो दाखवून तिचा विनयभंग केल्याची तक्रार युवतीने केली आहे. सोबतच इतर तीन कर्मचारी सुद्धा वेळोवेळी युवतीला वाईट उद्देशाने बोलत असून विनयभंग करीत असल्याचं पिडीत युवतीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या तीनही व्यक्तींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला तसचं पोलिसांनी या तीनही आरोपींना अटकही केली मात्र अर्ध्या तासातच त्यांची सुटका केल्याने पीड़ित तरुणीने आरोपींना कड़क शासन करुण न्याय देण्याची मागणी केली आहे.
            सामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि या आरोपीला वेगळा न्याय का ?  असा सवाल देखील पीडितेने उपस्थीत केला आहे . दरम्यान या संदर्भात पोलिसांना विचारणा केली असता ठाणेदार उत्तम जाधव यांनी बोलण्यास नकार दिला त्यामुळे यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांनी  नियमानुसार आरोपीचा जामीन मंजूर झाल्याचे मॅक्स  महाराष्ट्राच्या प्रतिनीधीला सांगितले. दरम्बुयान बुलडाणा पोलीस अधीक्षक शशी कुमार मीणा यांनी महिलांच्या सुरसक्षितेतेच्या दृष्टीने एक शॉर्ट फिल्म बनवूंन  सोशल मीडियावर व्हायरल केलीय, तसेच महिलांना असुरक्षित वाटत असल्यास थेट पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहनही  त्यांनी केले आहे . मात्र या प्रकरणात  महिलेने  पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार देऊनही आरोपी पोलिसांकडून मोकाट  सोडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात असून  बुलढाणा पोलीस महिला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहेत का हाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.