Home > मॅक्स किसान > बीटी कॉटन आणि गुलाबी बोंडअळी

बीटी कॉटन आणि गुलाबी बोंडअळी

बीटी कॉटन आणि गुलाबी बोंडअळी
X

कपाशीवर बोंडअळीच्या प्रार्दुभावाने शेतकरी संकटात

सध्या राज्यात कृषी कर्ज माफी, अवकाळी पाऊस, विषारी रासायनीक किटकनाशकांमुळे झालेले शेतकऱ्यांचे मृत्यू अशा एकामागून एक कृषी संकटे असताना कपाशीवर बोंडअळी पडल्यामुळे कपाशीचे प्रचंड मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी अधिकच मेटाकुटीस आला आहे.

राज्यात ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त कपाशीचं क्षेत्र असून या एकूण लागवडीपैकी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रातात बीटी बियाण्याची लागवड आहे. देशात २००१ पूर्वी कपाशीवरील बोंडअळीमुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी विविध रासायनीक किटकनाशकांच्या फवारणीवर अतिरीक्त खर्च होत होता. त्यामुळे कपाशीची शेती तोट्यात गेली होती. कपास उत्पादक शेतकऱ्याला मनस्तापाचीच नव्हे तर आत्महत्या करण्याची पाळी आली होती. आणि याच भरात अनेक शेतकऱ्यांनी जीवनाचा अंत करुन झालेल्या कर्जबाजारीपणातून आपली सुटका करुन घेतली होती.

बीटी कॉटन वाणाचा वापर

याचवेळी बीटी कापसाच्या सुधारीत वाणाची चर्चा देशात जोर धरू लागली. रोगांना अटकाव क्षमता आणि बोंड अळीपासून संरक्षण, भरघोस पिकाची हमी यामुळे बीटी कापूस लागवडीला सरकारनेही मान्यता दिली. मात्र त्या आधी याविषयावर कृषीतज्ञ, राजकीय नेते, शेतकरी नेते, कृषी अभ्यासक यांनी बाजूने आणि विरोधात मांडलेल्या भूमिकांमुळे शेतकी वातावरण चांगलच ढवळून निघालं होतं. अखेर पुढे देशात २००२ पासून बीटी कपाशीच्या लागवडीला सुरुवात झाली.

बीटी कॉटन वाणालाही बोंडअळीची लागण

बीटी म्हणजेच Bacillus thuringiensis हा जिन्स संकर करुन कपाशीत टाकण्यात आला. बीटी जिन्समुळे बोंडअळीचा सामना करण्याची प्रतिकार शक्ती वाढली. मात्र काही काळानंतर बीटी म्हणजेच बीजी-१ बियाण्यावर बोंडअळी दिसायला लागली. त्यानंतर बीजी-०२ म्हणजे आणखी एक जिन्स अळ्यांचा प्रतिकार करण्यासाठी बियाण्यात टाकण्यात आला. २००२ ते २०१४ पर्य़ंत बीजी-०१, बीजी-०२ या जिन्समुळे बोंडअळीपासून कपाशीचं संरक्षण झालं, यामुळेच देशात ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रात कपाशीच्या बीटी बियाण्याची लागवड झाली. पण गेल्या तीन-चार वर्षांत बीटी कपाशीची बोंडअळ्यांचा सामना करण्याची प्रतिकार शक्ती कमी झाली आणि कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसायला लागला.

बोंडअळीने केले २० लाख हेक्टर पीक फस्त

सरकारचे दुर्लक्ष

नागपूर येथील कापूस संशोधन केंद्राचे तत्कालीन डायरेक्टर डॉ. क्रांती यांनी ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली होती, पण सरकारणे लक्ष दिलं नाही. यंदा गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्के म्हणजेच महाराष्ट्रात २० लाख हेक्टरवरचं पीक फस्त केलं.

Updated : 8 Dec 2017 2:53 PM GMT
Next Story
Share it
Top