Home > मॅक्स किसान > ''बँकांमुळे नोटाबंदी, कर्जमाफी फसली'’

''बँकांमुळे नोटाबंदी, कर्जमाफी फसली'’

बँकांमुळे नोटाबंदी, कर्जमाफी फसली’
X

राज्यात कर्जमाफी जाहीर होऊन देखील शेतकऱी आत्महत्यांचे सत्र अजुनही थांबलेले नाही. राज्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही १२५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय, यातल्या निम्म्या आत्महत्या या विदर्भात झाल्यात, यावर बोलताना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी याचं खापर बँकांच्या कारभारावर फोडताना बॅकांवर सडकून टीका केली आहे. 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा पोहचत नाहीए, आणि त्याला बॅंका जबाबदार आहेत त्यामुळे जे बॅंक अधिकारी कर्जमाफीची नीट अमंलबजावणी करत नसतील त्यांना लाथ मारून हाकला' अशी जळजळीत प्रतिक्रिया शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिली आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी बेलआऊट पॅकेजची मागणीही यावेळी किशोर तिवारी यांनी केलीय.

Updated : 14 Nov 2017 3:38 PM GMT
Next Story
Share it
Top