फेसबुक्यांमध्ये ताई नंबर वन, दादा पिछाडीवर

497
130310_RZ_18

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनंतर मोठा नेता कोण या प्रश्नाचं उत्तर थोडंसं कठीण आहे. पण आम्हाला त्याचं उत्तर सापडलंय. उत्तर आहे सुप्रिया सुळे! हो! सध्या तरी हेच उत्तर खरं आहे. कारण सोशल मीडियावर  सध्या सुप्रिया सुळे यांचाच बोलबाल दिसून येतोय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पेक्षा सुप्रिया सुळे याच जास्त लोकप्रिय नेत्या आहेत. कारण फेसबुक्यांनी तरी त्यांनाच सर्वात जास्त पसंती दिलीय. राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांनी शनिवारी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. त्यावेळी सर्वात जास्त म्हणजे ७६ हजार लोकांनी सुप्रिया सुळेंचं हे लाईव्ह पाहिलं. तर ७ हजार लोकांनी कॉमेंट्स केल्या आणि ४१० लोकांनी ते शेअर केलंय.   पण त्याचवेळी अजित पवारांचं लाईव्ह मात्र ४९ हजार लोकांनी पाहिलंय. तर ३ हजार लोकांनी कॉमेट्स केल्यात आणि २७५ लोकांनी ते शेअर केलंय. तब्बल २७ हजार व्ह्यूजनं अजित दादा हे सुप्रियाताईं पेक्षा पिछाडीवर आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या फेसबुक पेजला फक्त ९९,६५४ लाईक्स आहेत. सुप्रियाताई यामध्ये मात्र तब्बल साडेचार लाखांनी पुढे आहेत. त्यांच्या फेसबुक पेजला ५,३९,३९४ लाईक्स आहेत. त्यामुळे फेसबुक्यांमध्ये तरी सध्या दादांपेक्षा ताईच वरचढ असल्याचं दिसून येतंय.